REVIEW : बालपणीच्या विश्वात घेऊन जाणारा ‘धप्पा’

लहान मुलांच्या भावविश्वावर प्रकाश टाकणारे आतापर्यंत अनेक चित्रपट आले. पण या सगळ्या चित्रपटांमध्ये निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित ”धप्पा’ हा चित्रपट त्याच्या सादरीकरणामुळे वेगळा ठरतो. राष्ट्रीय एकात्मता हा साधा-सोपा विषय या चित्रपटात हाताळण्यात आलाय. पण निपूणने ज्या पद्धतीने हा चित्रपट हाताळलाय त्यासाठी त्याला हॅट्स ऑफ.. समाजातील विघातक प्रवृत्तीला चित्रपटातील शूर बालजवान कसा धप्पा देतात हे या चित्रपटात […]

REVIEW : बालपणीच्या विश्वात घेऊन जाणारा 'धप्पा'
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

लहान मुलांच्या भावविश्वावर प्रकाश टाकणारे आतापर्यंत अनेक चित्रपट आले. पण या सगळ्या चित्रपटांमध्ये निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित ”धप्पा’ हा चित्रपट त्याच्या सादरीकरणामुळे वेगळा ठरतो. राष्ट्रीय एकात्मता हा साधा-सोपा विषय या चित्रपटात हाताळण्यात आलाय. पण निपूणने ज्या पद्धतीने हा चित्रपट हाताळलाय त्यासाठी त्याला हॅट्स ऑफ.. समाजातील विघातक प्रवृत्तीला चित्रपटातील शूर बालजवान कसा धप्पा देतात हे या चित्रपटात दाखवण्यात आलंय. आपल्या भारतात जरी ‘आपण हम सब एक है’चा नारा देत असलो तरी काही समाजविघातक प्रवृत्ती सदैव या एकात्मतेला धक्का लावण्याचं काम करत असतात. या सगळ्यावर मात करत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश हा चित्रपट देतो. 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय एकात्मतेवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘नर्गिस दत्त’ पारितोषिक देऊन या चित्रपटाला गौरविण्यात आलं होतं. त्यामुळे साहजिकच या चित्रपटाबद्दल उत्सुकता होती.

सुहृद, शारवी, चेतन, मिहीर, ऋत्विक, दीपाली, दशरथ, आदित्य या मित्रांची ही कथा. सोसायटीत गणेशोत्सवाच्या निमित्तानं पर्यावरण संरक्षणाविषयीचा संदेश देणारं नाटक बसवण्याचा निर्णय घेतला जातो..त्यामुळे ही सगळी बच्चेकंपनी कमालीची खुश होते..तुकारामांपासून ते अगदी येशू ख्रिस्तांपर्यंत अनेक पात्र या नाटकात असतात. नाटकाच्या तालमीही उत्साहात सुरु होतात..पण त्याचवेळीस भाऊ नावाचा राजकारणी येशूंचं पात्र नाटकात कसं याचं भांडवलं करतो हे नाटक मुलांनी करु नये यासाठी राडा करतो आणि नाटक करायचंच नाही असा फतवा काढतो. आता ही सगळी बाल सुपरहिरो भाऊच्या धमक्यांना भीक घालणार का ? नाटकात येशूंचं पात्र आहे ही गोष्ट भाऊला कशी कळते ? ही सगळी बच्चे कंपनी भाऊचा सामना कशा पद्धतीने करतात हे बघण्यासाठी तुम्हाला ‘धप्पा’ बघावा लागेल. लहान मुलांच्या आयुष्याभोवती या चित्रपटाचं कथानक फिरत असलं तरी मोठ्यांनाही हा चित्रपट आपलंस करुन घेतो हेच या चित्रपटाचं यश म्हणावं लागेल. चित्रपटात छोट्या छोट्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करण्यात आलाय. त्यामुळे चित्रपटातील हे प्रसंग तुमच्या आसपास तर घडत नाही ना असा ‘चकवा’ तुम्हाला आल्याशिवाय राहत नाही. कुठलाही प्रसंग फिल्मी न करता हलक्या-फुलक्या पध्दतीनं फुलवण्यात आलाय. मग सोमण काकांच्या झाडावरचे पेरु लंपास करण्याचा प्रसंग असो किंवा झाडावरील पेरु कोणी चोरला याचा जाब सोमण काका दशरथला विचारतात तो प्रसंग असो किंवा माऊली-माऊली करत फिरणाऱ्या मोहिते आजी असो किंवा भाऊ आणि पाटीलमधील संभाषण असो किंवा छोटा चेत्या आणि त्याच्या वडलांचा संभाषण असो असे अनेक या चित्रपटातील प्रासंगिक विनोद तुमच्या चेहऱ्यावर हास्याची कळी फुलवतात. या सगळ्या गोष्टींचा कर्ता-करविता अर्थातचं निपूण आहे.

‘बापजन्म’ या आपल्या पहिल्याच चित्रपटात निपूणने वेगळा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. धप्पामध्ये निपूणने एक पाऊल पुढे जात राष्ट्रीय एकात्मता, सणांना लागणारी राजकीय कीड, बाह्य सेन्सॉरशीप अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलंय. दिग्दर्शनात निपूणने बाजी तर मारलीच आहे पण चित्रपटातील सगळ्याच मुलांनीही अफलातून काम केलंय. चित्रपट बघताना आपणही नकळत आपल्या बालपणीच्या विश्वात रममाण होतो. गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णीची निर्मिती असल्यामुळे चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या आणि हा चित्रपट सगळ्या अपेक्षा पूर्ण करतो. बच्चेकंपनीसोबतचं इरावती हर्षे, गिरीश कुलकर्णी, सुनिल बर्वे, ज्योति सुभाष, उमेश जगताप, श्रीकांत यादव या कलाकारांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. सगळ्यांनी आपली काम चोख पार पाडली आहेत. हसता हसता टचकन डोळ्यात पाणी आणणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाचा विषय गंभीर असला तरी दिग्दर्शकानं तो योग्य पद्धतीने हाताळला आहे. कलाकारांची मोठी फौज चित्रपटात असल्यामुळे उगाचच चित्रपटाची लांबी वाढवण्याच्या फंद्यात न पडल्यामुळे चित्रपटाचा इम्पॅक्ट उत्तम पडतो. एकूणच काय तर चित्रपाटातून उत्तम संदेश देण्यात आलाय. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांसोबत हा चित्रपट वीकेंडला एन्जॉय करु शकतात. बच्चेकंपनीचा हा ‘धप्पा’ तुम्हाला निराश नाही करणार.

‘टीव्ही 9 मराठी’कडून या चित्रपटाला तीन स्टार्स

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.