इंजिनिअरींगचे सहा विद्यार्थी पोहण्यासाठी लळिंग धबधब्यावर, तिघांचा बुडून मृत्यू

| Updated on: Jun 22, 2020 | 11:41 PM

धुळ्यातील लळिंग येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू (Dhule three students Died laling Waterfall Drowning) झाला.

इंजिनिअरींगचे सहा विद्यार्थी पोहण्यासाठी लळिंग धबधब्यावर, तिघांचा बुडून मृत्यू
Follow us on

धुळे : धुळ्यातील लळिंग येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे तिघेही एस.एस.व्ही.पी इंजिनिअरींग कॉलेजचे विद्यार्थी आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Dhule three students Died laling Waterfall Drowning)

मिळालेल्या माहितानुसार, धुळे जवळील लळिंग धबधब्यावर एस.एस.व्ही.पी इंजिनिअरींग कॉलेजचे सहा विद्यार्थी पोहण्यासाठी गेले होते. मात्र यातील तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तीन जणांपैकी दोन जण हे धुळे शहरातील आहेत. तर एक अमळनेर येथील आहे.

शुभम अनिल चव्हाण (20), शुभम प्रेमराज पाटील (20), रोहित गिरासे (19) अशी या तीन मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. यातील शुभम चव्हाण हा धुळ्यात अभियंता नगर याठिकाणी राहतो. अद्याप त्याचा मृतदेह आढळलेला नाही. तर शुभम पाटील हा अमळनेरमधील पळासदळे या गावात राहतो. तर रोहित गिरासे हा धुळ्यातील जीटीपी अंबिका नगरमधील रहिवाशी आहे.

दरम्यान इतर तीन जणांवर धुळ्यातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे आणि तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. जखमी विद्यार्थ्यांना या घटनेचा जबरदस्त धक्का बसला आहे. (Dhule three students Died laling Waterfall Drowning)

संबंधित बातम्या : 

दागिने गहाण ठेऊन घरफोडीचा बनाव, स्वतःवरील कर्ज फेडण्यासाठी बिल्डरच्या पत्नीचा प्रताप

बाळा, पेरणी झाल्यावर टॅब घेऊन देतो, शेतकरी बापाचा शब्द टाळला, शाळकरी मुलाची आत्महत्या