AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दागिने गहाण ठेऊन घरफोडीचा बनाव, स्वतःवरील कर्ज फेडण्यासाठी बिल्डरच्या पत्नीचा प्रताप

नवी मुंबईत बिल्डरच्या पत्नीने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी दागिने गहाण ठेवत घरफोडीचा बनाव (Accused burglary in own house Navi Mumbai) केला.

दागिने गहाण ठेऊन घरफोडीचा बनाव, स्वतःवरील कर्ज फेडण्यासाठी बिल्डरच्या पत्नीचा प्रताप
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jun 22, 2020 | 4:34 PM
Share

नवी मुंबई : नवी मुंबईत बिल्डरच्या पत्नीने कर्ज फेडण्यासाठी दागिने गहाण ठेवत घरफोडीचा बनाव (Accused burglary in own house Navi Mumbai) केला. घरफोडी झाल्याने पतीने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी याचा तपास केला असता घरफोडी तक्रारदाराच्या पत्नीनेच केल्याचे समोर आले. ही घटना नवी मुंबईत कोपर खैराणेयेथील बोनकडेमध्ये  (Accused burglary in own house Navi Mumbai) घडली.

तक्रारदार हा बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) आहे. बिल्डरच्या पत्नीवर कर्ज होते. ते फेडण्यासाठी तिने पतीच्या नकळत घरातील दागिने गहाण ठेवले आणि त्याच रकमेतून स्वत:वरील कर्ज फेडले.

बंद घराच्या खिडकीतून आत घुसून चोरट्यांनी घरफोडी केल्याची तक्रार बोनकोडे येथे राहणाऱ्या बिल्डरने कोपर खैरणे पोलिसांकडे केली होती. वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वसीम शेख यांच्या पथकाने तपासाला सुरवात केली होती. पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता, सदर गुन्हा घडलेलाच नसल्याचे समोर आले.

फिर्यादी हा बिल्डर असून त्यांच्या पत्नीने परस्पर दागिने गहाण ठेवले. बदल्यात रक्कम मिळवून आणि इतर रकमेतून तिने स्वत:वरील कर्ज फेडल्याची कबुली दिली. तर पतीपासून लपवण्यासाठी घरात चोरी झाल्याचा बनाव केला. पोलिसांना गुन्हा घडल्याचा पुरावा आढळला नाही. त्यावरून कुटुंबातील व्यक्तीवरच संशय आल्याने उलट चौकशीत हा प्रकार उघड झाला.

संबंधित बातम्या :

Pune Suicide | मुलावर उपचार, पुण्यात रुग्णालयाच्या गच्चीवरुन आईची आत्महत्या

हनुवटीखाली झाडलेली गोळी डोक्यातून आरपार, हिंगोलीत आयुध विभागातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

Follow Us
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...