AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali Gift From Ambani Group : सोन्याची डब्बी अन् त्यामध्ये… अंबानी कुटुंबाकडून कर्मचाऱ्यांना कोणतं गिफ्ट?

रिलायन्स समूह भारतातील मोठ्या उद्योग समूहांपैकी एक आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी देशातील एक मोठे उद्योगपती आहे. त्यांच्या जीवनशैलीची चर्चा सोशल मीडियामध्ये सातत्याने होत असते. रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना आता दिवाळी गिफ्ट मिळाले आहे. या दिवाळी गिफ्टचा व्हिडिओ काढून कर्मचाऱ्यांनी शेअर केला आहे.

Diwali Gift From Ambani Group : सोन्याची डब्बी अन् त्यामध्ये... अंबानी कुटुंबाकडून कर्मचाऱ्यांना कोणतं गिफ्ट?
ambani FamiliyImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Nov 12, 2026 | 3:54 PM
Share

रिलायन्स समूह भारतातील मोठ्या उद्योग समूहांपैकी एक आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी देशातील एक मोठे उद्योगपती आहे. त्यांच्या जीवनशैलीची चर्चा सोशल मीडियामध्ये सातत्याने होत असते. अनंत अंबानी यांच्या लग्नातील गिफ्टनंतर रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना आता दिवाळी गिफ्ट मिळाले आहे. या दिवाळी गिफ्टचा व्हिडिओ काढून कर्मचाऱ्यांनी शेअर केला आहे.

रिलायन्स कंपनीकडून देण्यात आलेल्या गिफ्टसंदर्भात दाखवण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एक आबोली रंगाची पर्स दिसत आहे. त्यामध्ये एक कार्ड असून त्यावर “दीपावली शुभकामनाएं” आणि “शुभ दीपावली” लिहिले आहे. बॉक्सच्या आत एक त्याच रंगाची पिशवी आहे. या बॉक्समध्ये बदाम ठेवले होते.

गिफ्टमध्ये नेमकं काय काय? बदाम पॅकेटशिवया या मध्ये एक दिवा आहे. एक पिस्ता कलरची ब्रांडेड ओढणी आहे. त्यानंतर यामध्ये एक डब्बी दिसत आहे त्या डबीमध्ये एक लहानशी सोन्याची डबी आहे आणि त्यामध्ये एक चांदीची गणेश मुर्ती आणि मंत्र आहे.

व्हिडिओला अनेक लाईक यु्ट्युब युजरने शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, अंबानी परिवाराकडून दिवाळीची भेट. या व्हिडिओला लाखो नेटकऱ्यांनी पाहिले आहे. अंबानी परिवाराकडून देण्यात आलेल्या या गिफ्टमुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट अन् लाईकसुद्धा केले आहे. मात्र अनेक नेटकरी यावर खुश दिसत नाहीत. त्यांनी लिहिलं आहे की मोठे उद्योजक असूनही खूप कमी गिफ्ट दिलं आहे, एक नेटकऱ्याने सुरत मधील एका व्यापाऱ्याचं उदाहरण दिलं आहे, ज्याने कर्मचाऱ्यांना रोख एक लाख रुपये दिले होते.

अंबानी कुटुंबाकडून अनेकांना दिला जातो मदतीचा हात अलीकडेच एका बातमीनुसार ब्लिंकिट डिलिव्हरी एजंट सायकल वरून डिलिव्हरी करताना दिसतो आणि अंबानींचं फाऊनडेशन त्याला एक स्कूटर गिफ्ट कराता, ही स्कूटरची गिफ्ट अनंत सेवा फाऊंडेशनच्या मोहिमेचा एक भाग होता. राहुल कनाल आणि हुसैन मंसूरी यांच्या सोबत मिळून ही फाऊंडेशनने मुंबईतील घाम गाळून या शहराच्या प्रगतीत हातभार लावणाऱ्या कष्टकरी लोकांना इलेक्ट्रीक बाईक गिफ्ट दिली जात आहे.

Follow Us
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप,
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप, काँग्रेसचा चौकशीचा आग्रह
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक