चिनी सैनिकांनी पाकिस्तानच्या जवानांना धुतलं, जोरदार हाणामारी

| Updated on: Aug 10, 2020 | 8:36 PM

पाकिस्तान आणि चिनी सैन्यात जोरदार हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे (Dispute between Pakistan and China Soldiers over labourers positioning).

चिनी सैनिकांनी पाकिस्तानच्या जवानांना धुतलं, जोरदार हाणामारी
Follow us on

लाहोर : पाकिस्तान आणि चिनी सैन्यात जोरदार हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे (Dispute between Pakistan and China Soldiers over labourers positioning). चिनी सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांना प्रचंड मारहाण केली आहे. या मारहाणीनंतर पाकिस्तानी सैन्यात नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र, या प्रकरणावर पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

या घटनेनंतर पाकिस्तानी सैन्याचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल इमराम कासिम हे चिनी सैन्यासोबत मिळाले आहेत, असा आरोप पाकिस्तानी सैनिकांनी केला आहे (Dispute between Pakistan and China Soldiers over labourers positioning).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्प सुरु असलेल्या भागात चीनकडून 500 सैनिक तैनात करण्यात आले आहेत. या भागात चिनी आणि पाकिस्तानी कामगारांच्या पदावरुन हा वाद निर्माण झाला.

दरम्यान, या संघर्षानंतर पाकिस्तानी सैनिकांचे मनौधैऱ्याचे खच्चीकरण झाले आहे. कर्नल इमरान कासिम यांनी या वादाबाबतची माहिती लाइट कमांडो ब्रिगेड हेडक्वार्टरला दिली आहे. कामगारांच्या पदावरुन हा वाद उफाळल्याची माहिती त्यांनी दिली.

पाकिस्तान आणि चिनी सैनिकांमधील संघर्षात पाकिस्तानी सैनिकांनी मार खाल्ला असला तरी कॅम्प कमांडेट मेजर शहजाद यांनी आपल्या सैनिकांना या प्रकरणाला गांभीर्याने न घेता पुन्हा एकत्रपणे काम करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, या घटनेनमुळे पाकिस्तानी सैन्याच्या भावना दुखावल्या आहेत.

पाकिस्तान आणि चिनी सैनिकांमध्ये याअगोदरही अशाप्रकारची झडप झाली आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या उभारणीसाठी चीनला स्थानिक मजुरांची गरज लागते.

पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी चीनला स्थानिक मजूर उपलब्ध करुन देतात. पण ते सर्वसामान्य दरापेक्षा जास्त दरात मजूर उपलब्ध करुन देतात. याबाबत चिनी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनाही माहिती आहे. पाकिस्तानच्या मजुरांच्या वाढत्या अपेक्षांवरुन याआधीदेखील पाकिस्तान आणि चिनी कामगार आणि सैनिकात झडप झाली आहे.