Divyanka Tripathi | मुकेश खन्ना यांच्या वादग्रस्त व्हिडीओवर दिव्यांका त्रिपाठीचा निशाणा

Divyanka Tripathi | मुकेश खन्ना यांच्या वादग्रस्त व्हिडीओवर दिव्यांका त्रिपाठीचा निशाणा

टीव्हीवरचा लाडका ‘शक्तिमान’ जो सगळ्या जगातला चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करायचा, तो आता सध्या सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Nov 02, 2020 | 6:27 PM

मुंबई : टीव्हीवरचा लाडका ‘शक्तिमान’ जो सगळ्या जगातला चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करायचा, तो आता सध्या सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला आहे. ‘शक्तिमान’ साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) सध्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे वादात अडकले आहेत. ‘मी टू’ (Me Too) प्रकरणावर बोलताना त्यांनी महिलांविषयी चुकीची टिप्पणी केल्याने सगळ्या स्तरांतून त्यांच्यावर टीका होते आहे. आता या वादात सेलिब्रिटींनिही उडी घेतली आहे. मुकेश खन्ना यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करत दिव्यांका त्रिपाठीने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. (Divyanka Tripathi targets Mukesh Khanna controversial video)

अभिनेता मुकेश खन्ना यांच्या विधानाबद्दल दिव्यांका त्रिपाठी हिने नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणते की, ‘स्त्रियांनी घराच्या बाहेर पडू नये, पुरूषाच्या खांदयाला खांदा लावून काम करू नये, ही कुठली मानसिकता आहे. आणि हे किती जुने विचार आहेत. अशा प्रतिष्ठित मानसाने हे बोलणे तर आधिक आश्चर्यजनक आहे. बहुतेक महिलांविषयीचा हा जुना राग त्यांच्या मनात असावा.’ शेवटी दिव्यांका त्रिपाठी म्हणते, ‘मुकेशजी, आदरपूर्वक मी तुमच्या विधानाचा निषेध करते.’ काय म्हणाले होते मुकेश खन्ना ‘मी टू’ प्रकरणावर भाष्य करताना अभिनेते मुकेश खन्ना यांनी महिलांनाच चुकीचे ठरवले आहे. ते म्हणाले, ‘महिलांचे काम केवळ घर सांभाळणे होते. महिलांनी घराबाहेर पडून काम करायला सुरुवात केल्यावर हे ‘मी टू’ सारखे प्रकार घडायला लागले. आज स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालण्याची वार्ता करतात’. त्यांच्या याच वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली आहे. मुकेश खन्नांवर संतापले नेटकरी मुकेश खन्नांच्या या वक्तव्यानंतर नोकरी करणाऱ्या महिलांनी आपली नाराजी वक्त केली आहे. यावर एका वापरकर्त्याने कमेंट केली की, ‘आणि याच प्रकारे या मूर्ख शक्तिमानने आपले समाजातील स्थान बळकट करायचा प्रयत्न केला. ते नेमके कोणत्या प्रकारच्या कुटुंबात वाढले असतील, याचे आश्चर्य वाटते. त्यांना कोणीतरी विचारा की 5-6 वर्षांच्या लहान मुलींवर का बलात्कार होतात? स्त्री शक्तीला घाबरणाऱ्या या कमजोर पुरुषांना कुठलाही मंच मिळता कामा नये,’ असे म्हणत आपला रोष व्यक्त केला.

संबंधित बातम्या : 

Laxmmi Bomb | ‘लक्ष्मी बॉम्ब’वर आता ‘शक्तिमान’ही नाराज, मुकेश खन्नांकडून मेकर्सवर हल्लाबोल!

Shilpa Shetty | अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा चीनी ‘टिकटॉक’ला टक्कर देणार!

(Divyanka Tripathi targets Mukesh Khanna controversial video)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें