Dhananjay Munde Birthday | कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येऊ नका, धनंजय मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

| Updated on: Jul 15, 2020 | 12:40 AM

कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्या," असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं (Dhananjay Munde Birthday) आहे.

Dhananjay Munde Birthday | कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येऊ नका, धनंजय मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
Follow us on

बीड : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा आज (15 जुलै) वाढदिवस (Dhananjay Munde Birthday) आहे. मात्र “यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करु नका. कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येण्याचा प्रयत्न करु नये. कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्या,” असे आवाहन धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करु नका ही आपणा सर्वांना विनंती आहे. बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे, यातून मुक्त होण्यासाठी सर्वांनी आहेत तिथेच राहून प्रयत्न करावेत, याच माझ्यासाठी या वर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत,” असं धनंजय मुंडे म्हणाले.

“तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा मला लढण्याचे बळ देतात, परंतु यावर्षी कोरोनाशी लढण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. आपण सर्वांनी सुरक्षित राहणे गरजेचे आहे. सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच, कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येण्याचा प्रयत्न करू नये. कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्यावी,” असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

दरम्यान धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात होता. रुग्णालयातून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी हात उंचावून आणि हात जोडत डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले (Dhananjay Munde Birthday) होते.

संबंधित बातम्या :

Dhananjay Munde Corona Free | धनंजय मुंडेंची कोरोनावर मात, हात जोडून डॉक्टर, नर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार

धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा अहवाल निगेटिव्ह, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख होम क्वारंटाईन