AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhananjay Munde Corona Free | धनंजय मुंडेंची कोरोनावर मात, हात जोडून डॉक्टर, नर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला (Dhananjay Munde Corona Free) आहे.

Dhananjay Munde Corona Free | धनंजय मुंडेंची कोरोनावर मात, हात जोडून डॉक्टर, नर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार
| Updated on: Jun 22, 2020 | 6:34 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. संध्याकाळी चारच्या सुमारास धनंजय मुंडेंना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी हात उंचावून आणि हात जोडत डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले. (Dhananjay Munde Corona  free Discharged From Hospital)

धनंजय मुंडे यांना अकरा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची दुसरी कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र नियमानुसार पुढील 14 दिवस धनंजय मुंडे यांना होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांनी बाहेर पडताना रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे हात जोडून आभार मानले.

धनंजय मुंडे यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव, एक स्वीय सहाय्यक, दोन वाहन चालक, एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या सर्वांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली. त्यामुळे आता केवळ एक अंगरक्षक आणि एक कुक असे दोघेच जण  रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्याही प्रकृतीत सुधारणा होत आहे.

धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह 

दिलासादायक म्हणजे धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हेदेखील काही दिवस होम क्वारंटाईन झाले होते.

धनंजय मुंडे हे बीडमधील परळीचे आमदार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते आमदारपदी निवडून आले. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्या खांद्यावर सामाजिक न्याय मंत्रिपदाची धुरा देण्यात आली. त्यांनी आपल्या समर्थकांना उपास-तापास, नवस न करण्याचे आवाहन केले होते.

ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला संसर्ग

ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाली. याआधी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने या दोन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली.

(Dhananjay Munde Corona free Discharged From Hospital)

संबंधित बातम्या :

धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा अहवाल निगेटिव्ह, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख होम क्वारंटाईन

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.