Health | रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिवाळ्यातही शरीराला अधिक पाण्याची गरज!

| Updated on: Oct 28, 2020 | 6:32 PM

हिवाळ्यात पाण्याअभावी शरीर डीहायड्रेट होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे हायपोथर्मियासारख्या रोगाचा धोका वाढतो.

Health | रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिवाळ्यातही शरीराला अधिक पाण्याची गरज!
Follow us on

मुंबई : पाणी (Water) आपल्या शरीराच्या सर्व अवयवांसाठी खूप महत्त्वाचे आहे. मानवी शरीरात सुमारे 70 टक्के पाणी असते, जे पेशी, जीव आणि ऊतींचे नियमन करण्याचे कार्य करते. घाम, पचन आणि लघवी यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत असते. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. हिवाळ्यात (Winter Season) कमी पाणी प्यायल्याने ही समस्या अधिक वाढू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की शरीरातील पुरेसे पाणी केवळ आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठीच (Immunity) फायदेशीर नसते तर, त्याचे बरेच फायदे देखील शरीराला होत असतात. (Drink More water in winter season for boosting immunity)

आरोग्य तज्ञ म्हणतात की, उन्हाळ्यात एखाद्या व्यक्तीने दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिते. परंतु, हिवाळ्यात मात्र तहान कमी लागत असल्याने, इतके पाणी पोटात जाणे कठीणच होते. यामुळे, शरीर डीहायड्रेट होण्यास सुरुवात होते आणि यामुळे आरोग्यास मोठ्या प्रमाणात हानी पोहोचू शकते. म्हणूनच हिवाळ्यातही आपल्याला शरीराला भरपूर पाण्याची गरज भासते.

हिवाळ्यात पाण्याअभावी शरीर डीहायड्रेट होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे हायपोथर्मियासारख्या रोगाचा धोका वाढतो. शरीराचे तापमान संतुलित नसल्याने असे बरेचदा होते. आपल्या शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी हिवाळ्यात भरपूर पाणी प्यायल्याने हायपोथर्मियासारख्या आजारांपासून स्वतःचा बचाव करता येतो.(Drink More water in winter season for boosting immunity)

डीहायड्रेशनपासून बचाव होतो.

हिवाळ्याचा हंगाम हा आपल्या रोग प्रतिकारशक्तीची परीक्षा घेणारा कालावधी असतो. या काळात आपल्याला आजारी पाडणारे बरेच संसर्गजन्य रोग पसरलेले असतात. पाण्याअभावी डीहायड्रेशन झाल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे आपल्याला या आजारांपासून अधिकच धोका निर्माण होतो. म्हणूनच, रोग प्रतिकारशक्ती कायम ठेवण्यासाठी हिवाळ्यात भरपूर पाणी प्यावे.

वजन नियंत्रित राहते.

हिवाळ्याच्या काळात, जास्त कॅलरीयुक्त आहारामुळे आपले वजन वेगाने वाढू लागते. तसे, व्यायाम करत नसल्यास शरीर सुस्त होते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरी जळत नाहीत. अशा वेळी पाणी महत्ताव्ची भूमिका बजावते. शरीरातील पाण्याचे पर्याप्त प्रमाणात शरीरातील अधिक चरबी कमी करते. ज्यामुळे वजन वाढत नाही आणि आपण लठ्ठपणापासून दूर राहू शकतो.(Drink More water in winter season for boosting immunity)

शरीर निरोगी राहते.

शरीराला हायड्रेट ठेवण्याबरोबरच, पाणी आपले शरीर शुद्ध ठेवण्याचे काम देखील करते. लघवी आणि घाम या माध्यमातून पाणी शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे कार्य करते. तसेच, रक्तामधील आवश्यक पोषक घटक आणि ऑक्सिजनची मात्रा संतुलित करते. यामुळे आपले मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे आणि हृदय निरोगी राहते.

सौंदर्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पाण्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म आपल्या त्वचेच्या आरोग्यास चालना देण्याचे काम करतात. हिवाळ्यात चमकदार त्वचेसाठी शरीराचे हायड्रेट असणे खूप महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात, पाण्याअभावी त्वचा कोरडी पडू शकते आणि ओठ फुटणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच, हिवाळ्यात गरम पाणी पिणे देखील फायदेकारक ठरते.

Skin Care | सकस अन्न खा, भरपूर पाणी प्या, हिवाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपा!   

(Drink More water in winter season for boosting immunity)