Skin Care | सकस अन्न खा, भरपूर पाणी प्या, हिवाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपा!   

हिवाळा आला की, त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. या काळात अनेकांना त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते.

Skin Care | सकस अन्न खा, भरपूर पाणी प्या, हिवाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपा!   
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 5:26 PM

मुंबई : पाऊस थांबला की हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते. हिवाळ्याला (Winter Season) सुरुवात झाली की, त्वचेच्या अनेक समस्या डोके वर काढायला लागतात. हिवाळा आला की, त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. या काळात अनेकांना त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात नेमकी त्वचेची काळजी (Sjkin care) कशी घ्यावी, हे अनेकांना माहित नसते. या काळात त्वचा कोरडी पडते, भेगा पडतात. यासाठी लोक अनेक प्रकारच्या क्रिम वापरतात किंवा अनेक उपायही करतात (Skin care Tips for winter Season).

थंडीत अनेकांच्या त्वचेवर पुरळ येते, फंगल इन्फेक्शन सारख्या समस्या उद्भवतात. हिवाळ्यामध्ये (Winter Season) त्वचेतील आर्द्रता कमी होते. परिणामी अनेक वेळा त्वचा कोरडी पडून सतत शरीरावर खाज येते. थंडीमध्ये घाम यायचे प्रमाण कमी झाल्यानेसुद्धा त्वचा कोरडी होते. यामुळेच त्वचा फुटणे, खरखरीत होणे, कोरडी पडणे, खाज सुटणे असे त्रास होऊ लागतात. म्हणूनच हिवाळ्यामध्येसुद्धा जर निरोगी, सुंदर त्वचा (Skin care) हवी असेल तर थंडीमुळे शरीरात वाढणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

अंघोळीपूर्वी शरीराला तेल लावा.

अंघोळीच्या दहा मिनिटे अगोदर पूर्ण शरीरावर नारळाचे किंवा बदामाचे तेल लावून मालिश करा. यामुळे त्वचा कोमल आणि सतेज बनेल. याला दुसरा पर्याय म्हणजे आंघोळीच्या पाण्यात ऑलिव्ह ऑईल किंवा आपल्या आवडत्या कोलनचे काही थेंब टाकून अंघोळ करणे. अंघोळीसाठीचे पाणी जास्त गरम नसावे. गरम पाणी त्वचेचा नरमपणा काढून घेते आणि त्वचेला जास्त शुष्क बनवते. कारण गरम पाण्याने स्नान केल्यामुळे प्राकृतिक तेल नष्ट होते. अंघोळीच्या पाण्यात दोन टीस्पून मध घातल्याने त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. (Skin care Tips for winter Season)

भरपूर पाणी प्या.

उन्हाळ्यात शरीराला भरपूर पाण्याची गरज असल्याने खूप पाणी प्यायले जाते. परंतु, हिवाळ्यात थंडीमुळे तहान कमी लागते आणि कमी पाणी शरीरात जाते. परंतु हे त्वचेसाठी घातक ठरते. हिवाळ्यातही हवा कोरडी असल्याने शरीराला अधिक पाण्याची गरज असते. कोरड्या हवामानामुळे शरीरातील पाणी कमी होते. अशा परिस्थितीत, शरीरात ओलावा टिकवण्यासाठी आपण जास्तीत जास्त पाणी पिणे महत्वाचे आहे. या दिवसांत दर तासाला एक ग्लास पाणी प्यायले पाहिजे.

त्वचेची काळजी घेणारी उत्पादने काळजीपूर्वक निवडा.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणारी उत्पादने हिवाळ्यात आवश्यक नसतात. म्हणूनच, आपण हवामानानुसार उत्पादन निवडले पाहिजे. हिवाळ्यात निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. चेहरा स्वच्छ करण्यासाठी क्लीन्सर वापरा म्हणजे त्वचा ओलसर राहील. ही उत्पादने निवडताना आपल्या त्वचेचा पोत लक्षात घ्या. जेणेकरून ती उत्पादने अधिक प्रभावी ठरू शकतील. (Skin care Tips for winter Season)

आहाराची काळजी घ्या.

हिवाळ्यात बरीच हंगामी फळे आणि भाज्या बाजारात दिसू लागतात. फळे आणि हिरव्या भाज्या खाणे नेहमीच फायदेशीर ठरते. परंतु या हंगामात, विशेषत: बेरीज् (स्ट्रॉबेरी, कॅनबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी) खाणे फायद्याचे ठरते. बेरीमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात, ज्यामुळे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होते. हिवाळ्यात आहारात सूप, कोशिंबीर, रस आणि दूध यांचा समावेश करावा. यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल.

हात आणि पायांची विशेष काळजी घ्या.

हिवाळ्यात हात-पायांची आर्द्रता राखणे फार महत्वाचे आहे. पायात ओलावा टिकवण्यासाठी आपण मॉइश्चरायझर किंवा पेट्रोलियम जेली वापरू शकता. या व्यतिरिक्त आपण पायांना स्क्रब देखील करू शकता. हातांची त्वचा खूप मऊ असते, म्हणून घराबाहेर पडण्यापूर्वी हातांना मॉश्चरायझर लावा.

(Skin care Tips for winter Season)

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.