मुंबईच्या प्रभादेवीतील झोपडीधारकांना सर्वात मोठा दिलासा; एकनाथ शिंदेंनी शब्द दिला, थेट….

मुंबईच्या प्रभादेवीतील झोपडीधारकांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदेंनी झोपडीधारकांना शब्द दिला आहे. कारवाई थांबेल, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

मुंबईच्या प्रभादेवीतील झोपडीधारकांना सर्वात मोठा दिलासा; एकनाथ शिंदेंनी शब्द दिला, थेट....
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 20, 2026 | 1:00 PM

मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकालगत असलेल्या परिसरात 100 झोपडीधारकांना रेल्वे प्रशासनाने घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज झोपडीधारकांच्या घरावर बुलडोझर चालवण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली होती. कारवाईच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पश्चिम रेल्वेने कारवाई सुरू केल्यानंतर संत रोहिदास चाळीतील स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला. आंदोलनस्थळी बाळा नांदगावकर, आमदार अजय चौधरी हे घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत कारवाईला विरोध दर्शवला. आता या प्रकरणावर एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. तुमच्यावर रेल्वेकडून होणारी कारवाई थांबेल, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, या बाबतीत पंधरा दिवसांपूर्वी बैठक झाली. एसआरए, म्हाडा आणि रेल्वेची बैठक झाली. त्यावेळी अश्विनी वैष्णव यांच्यासोबत बैठक झाली. त्यांना सांगितलं की, या भागात 50-60 वर्षांपासून लोक राहत आहेत. त्यांचं योग्य पुनर्वसन करायला पाहिजे. याशिवाय त्यांचं अतिक्रमण काढता येणार नाही. एसआरए आणि रेल्वेच्या एका विभागाला डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली. त्यामुळे नागरिकांना कायमस्वरुपी घर मिळेल.. पुनर्विकास देखील होईल. तसेच रेल्वेचा विकास देखील होईल. त्यामुळे डीपीआर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माझं अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलणं झालं. मी त्यांना म्हटलं की, कारवाई व्हायला नको होती, त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलतो, असे सांगितले. तसेच कारवाई थांबण्याच्या सूचना देतो. त्यामुळे आता कारवाई थांबेल. याबाबत मुख्यमंत्री आणि माझी देखील चर्चा झाली आहे. स्थानिकांचा पुनर्विकासाचा प्रकल्प आहे. विकासाचं धोरण आहे’.

Loading...

‘प्रभादेवीतील स्थानिकांचा पुनर्विकाचा मार्ग मोकळा करू. राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय मिळून यांच्या डोक्यावरील टांगती तलवार कायम हटवण्याचं ठरवलं आहे. जी काय प्रक्रिया आहे, डीपीआर करण्याच्या सूचना दिल्या, त्याप्रमाणे काम सुरू होईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगतो की कारवाई थांबवा. पुनर्विकाचं धोरण आहे, त्यानुसार पुनर्विकास करू’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us