कोरोनाने मृत्यू, न पाहताच तातडीने मृतदेह दफन, महिला पुन्हा महिनाभराने घरी

| Updated on: Apr 27, 2020 | 5:33 PM

जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत (corona patient death ecuador) आहे.

कोरोनाने मृत्यू, न पाहताच तातडीने मृतदेह दफन, महिला पुन्हा महिनाभराने घरी
Follow us on

क्विटो (इक्वाडोर) : जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत (corona patient death Ecuador) आहे. याच दरम्यान दक्षिण अमेरिका खंडातील इक्वाडोर या देशात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इक्वाडोरमधील एका कुटुंबियांनी कोरोनाबाधितमहिलेचा मृतदेह न बघताच दफन केला. पण एक महिन्यानंतर मृत महिला घरी परतल्यानंतर कुटुंबियांना धक्काच (corona patient death Ecuador) बसला.

इक्वाडोरमध्ये एका 74 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा 27 मार्चला मृत्यू झाला.अल्बा मारुरी असं या महिलेचं नाव होतं. ही  महिला तीन आठवड्यांपासून बेशुद्ध होती. तिच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेऊन तात्काळ त्याचं दफन केलं. कोरोनाच्या धास्तीने मृतदेहाचं तोंड न पाहताच त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रुग्णालय प्रशासनाने महिलेच्या कुटुंबियांना शवघरातील एक मृतदेह दाखवून ओळख पटवण्यास सांगितले होते. पण कोरोनाच्या भीतीने कुणीही मृतदेहाजवळ गेले नाही. लांबूनच त्यांनी मृतदेह पाहिला आणि त्यांनी त्या मृतदेहाला अल्बा समजून तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

“मी मृतदेहापासून दीड मीटर अंतरावर होतो. त्यांचा चेहरा बघण्यास भीती वाटत होती. त्यांचे केस आणि चेहऱ्याचा रंग अल्बा यांच्यासारखा होता”, असं अल्बा यांच्या भाच्यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकरणानंतर 23 एप्रिल रोजी महिला शुद्धीत आली आणि तिने डॉक्टरला आपल्याबद्दल सांगितले. त्यानंतर रुग्णालयाने तिच्या कुटुंबियांशी संपर्क केला. ही माहिती तिच्या कुटुंबियांना मिळताच्या त्यांना धक्का बसला. पण आनंदही झाला होता.