जमिनीच्या वादातून माजी जवानाचा पुतण्यावर गोळीबार

येवला तालुक्यात जमिनीच्या वादातून माजी जवानाने थेट पुतण्यावर गोळीबार (Ex military man firing on Nephews) केला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जमिनीच्या वादातून माजी जवानाचा पुतण्यावर गोळीबार


नाशिक : येवला तालुक्यात जमिनीच्या वादातून माजी जवानाने थेट पुतण्यावर गोळीबार (Ex military man firing on Nephews) केला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (1 फेब्रुवारी) संध्याकाळी घडली. या गोळीबारात पुतण्या गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी येवला पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास (Ex military man firing on Nephews) करत आहेत.

येवला तालुक्यातील गणेशपूर येथे जमिनीच्या वादातून काका पुतण्यात जोरदार भांडण झाले. या भांडणात स्वत:चा बचाव करण्यासाठी काकाने पुतण्यावर गोळीबार केला. काका निवृत्ती होण्याआधी आर्मीमध्ये नोकरीला होते. या भांडणात पुतण्या धर्मराज थोरात याच्या उजव्या छातीला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी आहे.

या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी धाव घेत आरोपी काकाला अटक केली आहे. येवला तालुक्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI