बाप-लेकीचा अनोखा शैक्षणिक प्रवास, दोघेही एकाचवेळी दहावी पास!

| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

पुद्दुचेरी: तामिळनाडू जवळील पुद्दुचेरी येथे एक अनोखी घटना समोर आली आहे. पुद्दुचेरीमध्ये वडील आणि मुलीने एकाचवेळी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. गेल्या वर्षीही या पित्याने दहावीची परीक्षा दिली. तेव्हा ते यात यशस्वी झाले नाही. मात्र, यंदाच्या दहावीच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. महत्त्वाचं म्हणजे यंदा त्यांची मुलगीही दहावीला होती. 46 वर्षीय पिता आणि त्यांची 16 वर्षांची […]

बाप-लेकीचा अनोखा शैक्षणिक प्रवास, दोघेही एकाचवेळी दहावी पास!
Follow us on

पुद्दुचेरी: तामिळनाडू जवळील पुद्दुचेरी येथे एक अनोखी घटना समोर आली आहे. पुद्दुचेरीमध्ये वडील आणि मुलीने एकाचवेळी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. गेल्या वर्षीही या पित्याने दहावीची परीक्षा दिली. तेव्हा ते यात यशस्वी झाले नाही. मात्र, यंदाच्या दहावीच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. महत्त्वाचं म्हणजे यंदा त्यांची मुलगीही दहावीला होती. 46 वर्षीय पिता आणि त्यांची 16 वर्षांची मुलगी या दोघांनीही या परीक्षेत यश मिळवलं.

दहावीच्या परीक्षेचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यामध्ये सुब्रमण्यम यांनी यश मिळवलं. सुब्रमण्यम पीडब्ल्यूडीमध्ये क्षेत्र निरीक्षक म्हणूक कार्यरत आहेत. पण, सुब्रमण्यम हे केवळ सातव्या वर्गापर्यंत शिकलेले होते. काही वर्षांपूर्वी अनुकंपा तत्त्वावर त्यांना ही नोकरी मिळाली होती. पण त्यांना नोकरीत प्रमोशनसाठी अनिवार्य योग्यता मिळवणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी 2017 मध्ये आठवीची परीक्षा उत्तीर्ण केली.

आठवीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी गेल्यावर्षी बाह्य विद्यार्थी म्हणून दहावीची परीक्षा दिली. मात्र, त्या परीक्षेत ते गणितासह तीन विषयांमध्ये नापास झाले होते. त्यानंतर यावर्षी मार्चमध्ये त्यांनी या तीन विषयांचे पेपर दिले. या तीनही विषयात ते पास झाले.  तर त्यांची मुलगी तिरीगुणा ही देखील याचवर्षी दहावीला होती. तिरीगुणानेही दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. पिता-पुत्रीने एकाचवेळी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याने सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.

VIDEO :