PHOTO | सहा वर्षीय मुलीचा हट्ट पुरविण्यासाठी वडील आणि आजोबांची शक्कल, लॉकडाऊनमध्ये घरीच साकारली ‘मेड इन इंडिया विंटेज कार’
पिंपरी-चिंचवडमध्ये एका सहा वर्षीय मुलीचा हट्ट पुरविण्यासाठी मेड इन इंडिया विंटेज कार साकारण्यात आली आहे.

- पिंपरी-चिंचवडमध्ये एका सहा वर्षीय मुलीचा हट्ट पुरविण्यासाठी मेड इन इंडिया विंटेज कार साकारण्यात आली आहे.
- पिंपरी-चिंचवडमधील वडील आणि आजोबाने ही किमया साधली आहे. लॉकडाऊनमध्ये जुगाड करुन अवघ्या चार महिन्यातच ही कार तयार झाली.
- पिंपरी-चिंचवडमधील हसन आणि जावेद शेख यांनी हुबेहूब विंटेज कार साकारली आहे. लॉकडाऊनमध्ये सहा वर्षीय मुलगी तंजीलाने मेड इन चायना कारसाठी हट्ट धरला होता. आता हा हट्ट पुरविण्याविना त्यांच्यासमोर पर्यायच उरला नाही.
- पण, लॉकडाऊनमधील चिनबद्दल निर्माण झालेल्या द्वेषामुळे त्यांनी मेड इन इंडिया कार बनविण्याचा निर्णय घेतला.
- गेली आठ वर्षे गाड्या मॉडिफाय करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. याचा अनुभव ही कार बनवताना कामी आला आणि बघता बघता कार तयार झाली.
- तंजीलाने ज्या मेड इन चायना कारसाठी हट्ट धरला होता, त्याहून सरस तिला ही मेड इन इंडिया कार तिला मिळाली. त्यामुळे ती आणि तिचं कुटुंबीय भलतेच आनंदात आहेत.
- मेड इन चायना वस्तू वापरु नका, असं प्रत्येक व्यक्ती म्हणतोय. पण ते शेख कुटुंबियांप्रमाणे कृतीत उतरवणं गरजेचं आहे. तेंव्हाच चीनला धडा शिकवला असं म्हणता येईल.