कोरोनामुळे नागपूर मनपावर आर्थिक संकट, उत्पन्न 274 कोटींनी घटलं

| Updated on: Sep 24, 2020 | 8:20 AM

मालमत्ता कर, पाणीपट्टी कर आणि बाजार नगररचना करातही घट झाली आहे. कोरोनामुळे शासकीय अनुदान घटल्याने मनपासमोर मोठं आर्थिक संकट उभं झालं आहे.

कोरोनामुळे नागपूर मनपावर आर्थिक संकट, उत्पन्न 274 कोटींनी घटलं
Follow us on

नागपूर : मुंबई महानगरपालिकेनंतर आता नागपूर महानगरपालिकेचंही कोरोनामुळे आर्थिक नुकसान झालं आहे (Financial Loss To Nagpur Municipal Corporation). कोरोना विषाणूमुळे नागपूर महानगरपालिकेवर मोठं आर्थिक संकंट उद्भवलं आहे. कोरोनामुळे नागपूर मनपाचं तब्बल 274 कोटी 59 लाख रुपयांचं उत्पन्न घटलं आहे (Financial Loss To Nagpur Municipal Corporation).

मालमत्ता कर, पाणीपट्टी कर आणि बाजार नगररचना करातही घट झाली आहे. कोरोनामुळे शासकीय अनुदान घटल्याने मनपासमोर मोठं आर्थिक संकट उभं झालं आहे.

कोरोनामुळे मनपाचं एकूण 274 कोटी 59 लाख रुपये उत्पन्न घटलं आहे. मनपाचं उत्पन्न घटल्याने शहरातील विकास कामांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिका दुहेरी संकटात सापडली आहे. आधीच शहरात कोरोनाचा कहर त्यात आता नागपूर मनपाला आर्थिक अडचणीलाही सामोरे जावं लागणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 274 कोटी 59 लाख रुपये उत्पन्न घटलं. गेल्या वर्षी याच पाच महिन्यात 1019 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता, पण यावर्षी कोरोनामुळे अवघे 744 कोटी 95 लाख रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले. कोरोनामुळे यंदा मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, बाजार नगररचना कर, इतर विभागांचं उत्पन्न घटलं. या दुष्काळात तेरावा म्हणून शासकीय अनुदानातंही घट झाली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 274 कोटी 59 लाख रुपये उत्पन्न घटलं.

कोरोनाच्या संकटामुळे नागपूर महानगरपालिकेचं उत्पन्न घटल्याने, शहरातील विकास कामांवर मोठा परिणाम होणार, अशी भिती स्थायी समिती सभापती पिंटू झलके यांनी व्यक्त केली. मनपा कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर कामांवर होणारा खर्च आणि सध्याचं उत्पन्न पाहता, ताळमेळ करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असून, याचा सर्वाधिक फटका शहरातील विकास कामांवर होणार, असंही स्थायी समिती सभापती म्हणाले.

नागपूर जिल्ह्यात 24 तासात 1291 नवे कोरोना रुग्ण

नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1,291 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 24 तासात तब्बल 51 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 67,671 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत एकूण 2,205 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे (Financial Loss To Nagpur Municipal Corporation).

24 तासात 1,357 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण 51,912 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 13,554 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

कोरोना रुग्णांसाठी नागपुरात 53 रुग्णालये

कोरोना रुग्णांसाठी नागपुरात 53 रुग्णालयं उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामध्ये 6 सरकारी तर 47 खाजगी रुग्णालयांटा समावेश आहे. महानगरपालिकेच्या प्रयत्नाने 3436 बेड्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. बेडच्या स्थितीबाबत 0712-2567021 केंद्रीय नियंत्रण कक्षाची सोय करण्यात आली आहे.

कोरोना नियंत्रणासाठी मनपाचे झोनस्तरीय नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत. झोनचे सहाय्यक आयुक्त नियंत्रण कक्षाचे झोनल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांना त्वरीत उपचारासाठी प्रत्येक झोनमध्ये पाच रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

Financial Loss To Nagpur Municipal Corporation

संबंधित बातम्या :

Covishield Vaccine | ‘कोविशील्ड’ लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरच्या रुग्णालयाला परवानगी

नागपुरातील प्रस्तावित कोव्हिड रुग्णालयाला मान्यता, कोर्टाच्या कानउघाडणीनंतर सरकारचा निर्णय