पुण्यात वाळू सप्लायरवर गोळीबार, गोळी गालाला लागून गेल्याने थोडक्यात बचावला

| Updated on: Oct 12, 2020 | 4:05 PM

सोमवारी सकाळच्या सुमारास वानवडी परिसरात एका वाळू सप्लायरवर गोळीबार झाल्याची घटना घडली.

पुण्यात वाळू सप्लायरवर गोळीबार, गोळी गालाला लागून गेल्याने थोडक्यात बचावला
जबलपूरमध्ये काँग्रेस आमदाराच्या मुलाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
Follow us on

पुणे : बांधकाम व्यावसायिकाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच (Firing On Sand Supplier), सोमवारी सकाळच्या सुमारास वानवडी परिसरात एका वाळू सप्लायरवर गोळीबार झाल्याची घटना घडली. मयूर विजय हांडे (वय 29) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे (Firing On Sand Supplier).

ही घटना पुण्याच्या इनामदार ग्राऊंडच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत घडली. हांडे यांच्या गालाला गोळी लागून गेली असून, उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयूर हांडे याचा वाळू सप्लाय करण्याचा व्यावसाय आहे. सोमवारी सकाळी बाराच्या सुमारास ते वाळू टाकण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन इनामदार ग्राऊंच्या शेजारी असलेल्या मोकळ्या आले होते. त्यावेळी एका व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार केला. गोळी त्याच्या गालाला चाटून गेली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालायता दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं असून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Firing On Sand Supplier

संबंधित बातम्या :

चोराचं धाडस बघा ! चक्क कोरोना रुग्णालयात जाऊन करायचा चोरी; पोलीसही अवाक

दारु चढली; अंबरनाथमध्ये क्षुल्लक वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या

रायगडमध्ये मजुरी करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, ठेकेदारावर अ‍ॅट्रोसिटी, बलात्काराचा गुन्हा दाखल