Narayan Rane vs Shiv Sena : नितेश राणे गायब, नारायण राणेंच्या दारावर पोलिसांची नोटीस, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

राणेंच्या पाठिमागे भाजप खंबीरपणे उभे आहे, राज्यात पोलिसांना दरोडेखोर, बलात्काऱ्यांना पकडायला वेळ मिळत नाही. मात्र घरावरती जाऊन नोटिसा चिकटवतात हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, याचा मी निषेध करतो अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Narayan Rane vs Shiv Sena : नितेश राणे गायब, नारायण राणेंच्या दारावर पोलिसांची नोटीस, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 4:30 PM

कणकवली पोलिसांकडून सध्या आमदार नितेश राणेंचा शोध सुरू आहे, त्यावरूनच पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे, त्यावर आता भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी राणेंना सूडभावनेतून टार्गेट करत असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे, मात्र पोलीस कारवाईत कोणताही हस्तक्षेप नाही असे महाविकास आघाडीतील नेते सध्या सांगत आहेत, मात्र यावरून पुन्हा एकदा जोरदार घमासान सुरू झाले आहे.

राणेंना नोटीस, फडणवीस काय म्हणाले?

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राणेंना बजवलेल्या नोटीसीवर प्रतिक्रिया दिली आहे. राणेंच्या पाठिमागे भाजप खंबीरपणे उभे आहे, राज्यात पोलिसांना दरोडेखोर, बलात्काऱ्यांना पकडायला वेळ मिळत नाही. मात्र घरावरती जाऊन नोटिसा चिकटवतात हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, याचा मी निषेध करतो अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सिंधुदुर्गमध्येही अनेक बेकायदेशीर धंदे सध्या आहेत, त्याकडे लक्ष द्यायला पोलिसांना वेळ नाही मात्र, राणेंच्या पाठिमागे लागायला वेळ आहे. असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

राणेंना अटक झालेली तेव्हाही फडणवीसांची अशीच प्रतिक्रिया

मागे मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त विधान केल्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली होती, तेव्हाही राणेंच्या पाठिमागे खंबीरपणे उभे असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यावेळी फडणवीस म्हणाले होते, राणेंच्या वाक्यचे समर्थन नाही, मात्र भाजप त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे आणि आता राणेंना पुन्हा पोलिसांनी नोटीस बजवल्यावरून भाजप नेते आक्रमक झाले आहे. महाविकास आघाडी सरकार अहंकारातून ही कारवाई करत असल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात येत आहे.

नारायण राणेंच्या बंगल्यावर पोलिसांची नोटीस, दहाच मिनिटात राणेंच्या कर्मचाऱ्याने नोटीस काढली?

 नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस; 3 वाजता हजर राहण्याचे आदेश

खासदार सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण, पती सदानंद सुळेंचा अहवालही पॉझिटिव्ह, ट्विटरवरून दिली माहिती