नारायण राणेंच्या बंगल्यावर पोलिसांची नोटीस, दहाच मिनिटात राणेंच्या कर्मचाऱ्याने नोटीस काढली?

भाजप आमदार नितेश राणे बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या घरावर पोलिसांनी नोटीस लावली आहे. नितेश राणेंना हजर करा किंवा स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहा.

नारायण राणेंच्या बंगल्यावर पोलिसांची नोटीस, दहाच मिनिटात राणेंच्या कर्मचाऱ्याने नोटीस काढली?
narayan rane
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 4:05 PM

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या घरावर पोलिसांनी नोटीस लावली आहे. नितेश राणेंना हजर करा किंवा स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहा, अशी सूचना या नोटिशीत देण्यात आली आहे. मात्र, नोटीस लावून दहा मिनिटं होत नाही तोच राणेंच्या कर्मचाऱ्यांनी ही नोटीस काढून टाकली. त्यामुळे आता राणे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नितेश राणे यांच्या ठावठिकाण्याची माहिती मिळावा म्हणून कणकवली पोलीस नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये गेले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना नोटीस दिली. मात्र, त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला. त्यानंतर पोलीस राणेंच्या कणकवली येतील निवासस्थानी आले. पोलिसांनी राणेंच्या ओम गणेश बंगल्यावर नोटीस लावली. दुपारी 3 वाजता ही नोटीस लावण्यात आली. ही नोटीस लागल्यानंतर मीडियाला याची वार्ता कळताच मीडियाने बंगल्याच्या दिशेने धाव घेतली. ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. अवघ्या दहा मिनिटातच राणेंच्या कर्मचाऱ्याने ही नोटीस काढून टाकली.

पोलिसांची नोटीस जशीच्या तशी

प्रति,

सी.आर.पी.सी कलम 160 (1) अन्वये नोटीस

श्री. नारायण तातु राणे, (केंद्रीय मंत्री, भारत सरकार) रा. ओम गणेश बंगला, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग यांना

विषय:- गुन्ह्याचे तपासकामी कणकवली पोलीस ठाणे येथे हजर राहणेबाबत.

संदर्भ :- कणकवली पोलीस स्टेशन, जिल्हा सिंधुदुर्ग गुन्हा रजि, क्रमांक ३८७/२०२१ IPC कलम ३०७, १२० (ब), ३४ प्रमाणे.

आपणास या नोटीसीद्वारे सुचित करण्यात येते की, कणकवली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं.३८७/२०२१ भा.द.वि.कलम ३०७,१२० (ब), ३४ या गुन्ह्यात श्री. नितेश नारायण राणे हे पाहीजे आरोपी असून त्यांचा ठावठिकाणा अथक प्रयत्न करुन सुद्धा मिळुन येत नाही व सदर आरोपीचा शोध जारी आहे.

आपण काल दि. २८.१२.२०२१ रोजी पत्रकार परीषद घेतली होती. सदर गुन्हयाबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. तसेच एका पत्रकाराने आपणास पाहीजे आरोपी श्री. नितेश राणे यांच्या ठाव ठिकाणाबद्दल प्रश्न विचारला असता आपण श्री. नितेश राणे हे कोठे आहेत ते सांगायला आम्ही मुर्ख आहोत का? असे विधान केले. तसेच सदरील बाबतीत आज दि.२९.१२.२०२१ रोजी रत्नागिरी टाईम्स आणी इतर वृत्तपत्रातुन आपले सदर विधान प्रसिद्ध झाले आहे.

वरील सर्व बाबींचा सर्वकष विचार करता असे दिसते की, श्री. नितेश राणे या आरोपीचा ठाव ठिकाणा आपणास पुर्णपणे माहीती आहे.

तरी सदरील नोटीस मिळताच आपण पाहीजे आरोपी श्री. नितेश राणे यास आमचे समोर हजर करावे. तसेच आपल्या पत्रकार परीषदेनुसार आपल्याला माहीती असलेल्या गुन्हयाच्या तपशिलाबाबत जबाब नोंदविण्यासाठी दि. २९.१२.२०२१ रोजी १५.०० वाजता कणकवली पोलीस ठाणे येथे आमचे समोर स्वतः हजर रहावे.

● निरीक्षक पोलीस कणकवली

(सचिन ए. हुंदळेकर) पोलीस निरीक्षक कणकवली पोलीस

संबंधित बातम्या:

Video| नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस; 3 वाजता हजर राहण्याचे आदेश

खासदार सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण, पती सदानंद सुळेंचा अहवालही पॉझिटिव्ह, ट्विटरवरून दिली माहिती

Attempt To Suicide : …आणि अशाप्रकारे लोहमार्ग पोलिसांनी वाचवला आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचा जीव

Non Stop LIVE Update
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.