AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण, पती सदानंद सुळेंचा अहवालही पॉझिटिव्ह, ट्विटरवरून दिली माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह पती सदानंद यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे ट्विट त्यांनी केलेय.

खासदार सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण, पती सदानंद सुळेंचा अहवालही पॉझिटिव्ह, ट्विटरवरून दिली माहिती
सुप्रिया सदानंद सुळे
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 29, 2021 | 3:53 PM
Share

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे पती सदानंद सुळे या दोघांचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. सुप्रिया सुळे यांनी आज ट्विटरवरून ही माहिती दिली. त्यामुळे आमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे यांनी काय ट्विट केले?

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज 29 डिसेंबर रोजी त्यांच्या टि्वटर हँडलवरून दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोना

काल दिनांक 28 डिसेंबर रोजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्यांनीदेखील ट्विट करून ही माहिती दिली. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते. वर्षा गायकवाड या हिवाळी अधिवेशनात उपस्थित होत्या. त्यामुळे इतर मंत्र्यांनाही बाधा होते की काय ही चिंता वाढली आहे.

इतर बातम्या-

सिंधुदुर्ग पोलिसांनी नारायण राणेंना नोटीस बजावली, कोणत्या वर्तणुकीवर घेतला आक्षेप? वाचा नोटिसीचा मजकूर सविस्तर!

राज्यपाल-सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी कशामुळे पडली? संजय राऊतांनी सांगितलं नेमकं कारण!

Follow Us
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
आपल्याकडे म्हणतात ना ते... सुर्यकुमार यादवची मराठी ऐकली का? पहा दहीहंडी उत्सवातील मजेदार व्हिडीओ