येरवडा कारागृहातून पाच कैद्यांचे पलायन, तात्पुरत्या जेलच्या खिडकीचे गज कापून पसार

| Updated on: Jul 16, 2020 | 11:13 AM

अजिंक्य कांबळे, गणेश चव्हाण, अक्षय चव्हाण, देवगण चव्हाण आणि सनी पिंटो हे कारागृहातून फरार झाले.

येरवडा कारागृहातून पाच कैद्यांचे पलायन, तात्पुरत्या जेलच्या खिडकीचे गज कापून पसार
Follow us on

पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहातून पाच कैद्यांनी बुधवारी मध्यरात्री पलायन केले. पळून गेलेल्या कैद्यांमध्ये मोक्का अंतर्गत अटकेत असलेल्या तिघा कैद्यांचा समावेश आहे. एकाच वेळी पाच कैदी पसार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Five Prisoners escaped from Temporary jail of Yerawada Central Prison)

येरवडा कारागृह अंतर्गत तात्पुरत्या वसतिगृहाच्या जेलमधून कैद्यांनी पलायन केलं. कारागृहातील खिडकीचे गज कापून या कैद्यांनी पळ काढला. यापूर्वीसुद्धा काही कैद्यांनी कारागृहातून धूम ठोकली आहे. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अजिंक्य कांबळे, गणेश चव्हाण, अक्षय चव्हाण, देवगण चव्हाण आणि सनी पिंटो हे कारागृहातून फरार झाले. या कैद्यांपैकी देवगण चव्हाण, गणेश चव्हाण, अक्षय चव्हाण यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

कारागृहातील इमारतीच्या चौथ्या बिल्डींगमधील पाचव्या मजल्यावरील एका खोलीत या कैद्यांना ठेवण्यात आलं होतं. मध्यरात्रीच्या सुमारास या कैद्यांनी खिडकीचे गज कापले आणि पळ काढला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

या कैद्यांपैकी तिघे जण दौंड तालुक्यातील आहेत, एक कैदी पुणे शहरातील आणि एक हवेली तालुक्यातील रहिवासी आहे. या प्रकरणी दौंड, वाकड आणि हवेली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी आता कारागृह आणि पोलीस प्रशासनाकडून कसून तपास सुरु आहे. आरोपींना कारागृहातील इतर कैद्यांनी मदत केली आहे का, त्यांना बाहेरुन कोणाची मदत मिळाली का, याबाबत इतर कैदी आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

संबंधित बातम्या

येरवडा जेलमधून सातारा जेलमध्ये पाठवलेल्या 4 कैद्यांना कोरोना, साताऱ्यातील रुग्णसंख्या 77 वर

(Five Prisoners escaped from Temporary jail of Yerawada Central Prison)