196 किलो सोनं, 1.70 कोटी रोख, सर्वात मोठ्या घोटाळ्यातील संपत्ती सरकारी खजिन्यात

चारा घोटाळ्यात जी कुठली संपत्ती जप्त करण्यात आली आहे ती झारखंड सरकारच्या खजिन्यात साठवली जाणार आहे. यापूर्वी सीबीआय न्यायालयानेही असाच निर्णय दिला होता.

196 किलो सोनं, 1.70 कोटी रोख, सर्वात मोठ्या घोटाळ्यातील संपत्ती सरकारी खजिन्यात

रांची : बिहारच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यात (Fodder Scam) जप्त केलेलं तब्बल 196 किलोग्राम सोनं आणि 1.70 कोटी रुपये हे झारखंडच्या सरकारी खजिन्यात जाणार आहे. हे सर्व पैसे चारा घोटाळ्यातील आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत. झारखंडमध्ये हेमंत सोरेन (CM Hemant Soren) यांच्या नेतृत्व रविवारी (29 डिसेंबर) नवीन सरकार स्थापन झालं. झारखंडच्या खजिन्यात इतकी संपत्ती जमा होणे हे नवीन सरकारसाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. आता हे हेमंत सोरेन सरकारवर असेल की त्यांना ही संपत्ती कशाप्रकारे खर्च करायची आहे (Jharkhand Government Treasury).

न्यायालयाच्या आदेशानुसार, चारा घोटाळ्यात जी कुठली संपत्ती जप्त करण्यात आली आहे ती झारखंड सरकारच्या खजिन्यात साठवली जाणार आहे. यापूर्वी सीबीआय न्यायालयानेही असाच निर्णय दिला होता. त्यांच्यामते, गहाळ करण्यात आलेल्या संपत्तीमधील बहुतेक संपत्ती ही सरकारची आहे, त्यामुळे जप्त झालेली संपत्तीही राज्य सरकारला मिळायला हवी (Jharkhand Government Treasury).

या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. श्याम बिहार सिंहकडून 32 किलो सोनं, डॉ. केएम प्रसादकडून 106 किलो सोनं आणि त्रिपुरारी मोहन प्रसादजवळून 38 किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं. सर्वात जास्त रोकड 1 कोटी 33 लाख रुपये हे दीपेश चंडोकजवळून जप्त करण्यात आले होते. न्यायालयाच्या वतीने इतर आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या संपत्तीविषयी विस्तृत माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. लालू प्रसाद यादव आणि माजी मुख्यमंत्री जगन्नथ मिश्रा यांना तुरुंगातही जावं लागलं होतं. लालू प्रसाद यादव हे अद्यापही तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI