‘फोर्ब्स’ची सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांची टॉप 100 यादी जाहीर, अव्वल कोण?

| Updated on: Dec 20, 2019 | 3:13 PM

फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप सेलिब्रिटींची यादी (Forbes top 100 popular celebrity list) जाहीर केली आहे.

फोर्ब्सची सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांची टॉप 100 यादी जाहीर, अव्वल कोण?
Follow us on

मुंबई : फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक कमाई आणि प्रिसिद्धी मिळवणाऱ्या टॉप सेलिब्रिटींची यादी (Forbes top 100 popular celebrity list) जाहीर केली आहे. या यादीत पहिल्या स्थानावर भारतीय कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीची वार्षिक कमाई 252.72 कोटी आहे. कमाई आणि प्रिसिद्धीच्या आधारावर कोहलीने पहिले स्थान (Forbes top 100 popular celebrity list) मिळवले आहे. दरम्यान, फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 सेलिब्रिटींची यादी वार्षिक कमाई आणि प्रिंट-सोशल मीडियाच्या प्रिसिद्धीच्या आधारावर केली जाते.

फोर्ब्स इंडियाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर अभिनेता अक्षय कुमारने स्थान मिळवले आहे. अक्षयची यावर्षाची वार्षिक कमाई 293.25 कोटी रुपये आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर अभिनेता सलमान खान आहे. सलमानची वार्षिक कमाई 229.25 कोटी रुपये आहे.

या यादीत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची वार्षिक कमाई 239.25 कोटी रुपये आहे. तर पाचव्या क्रमांकावर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे. धोनीची वार्षिक कमाई 135.93 कोटी आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. शाहरुखची वार्षिक कमाई 124.38 कोटी रुपये आहे. तर अभिनेता रणवीर सिंह सातव्या क्रमांकावर असून त्याची वार्षिक कमाई 118.2 कोटी रुपये आहे.

विशेष म्हणजे फोर्ब्सच्या या यादीत पहिल्या टॉप 10 मध्ये अभिनेत्री आलिया भटने स्थान मिळवले आहे. आलिया आठव्या स्थानावर असून तिची वार्षिक कमाई 59.21 कोटी आहे.

माजी क्रिकेटर सचिन तेंडूलकर नवव्या क्रमांकावर असून त्याची वार्षिक कमाई 76.96 कोटी आहे. तर दहाव्या क्रमांकावर अभिनेत्री दीपिका पादुकोण आहे. तिची वार्षिक कमाई 48 कोटी रुपये आहे.