विचारवंतांच्या हत्यांमध्ये ‘सनातन प्रभात’च्या माजी संपादकाचे नाव

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

बंगळुरु : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. या प्रकरणात ‘सनातन प्रभात’चे माजी संपादक शशिकांत राणे यांचं नाव समोर आलं आहे. एसआयटीच्या पुरवणी दोषारोपपत्रात राणे यांचं नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्नाटक एसआयटीने या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केलं आहे. शशिकांत राणे यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. एमएम कलबुर्गी […]

विचारवंतांच्या हत्यांमध्ये सनातन प्रभातच्या माजी संपादकाचे नाव
Follow us on

बंगळुरु : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. या प्रकरणात ‘सनातन प्रभात’चे माजी संपादक शशिकांत राणे यांचं नाव समोर आलं आहे. एसआयटीच्या पुरवणी दोषारोपपत्रात राणे यांचं नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्नाटक एसआयटीने या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केलं आहे. शशिकांत राणे यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. एमएम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश हत्येसाठी पैसे पुरवल्याचा आरोप एसआयटीने केला आहे.

पत्रकार गौरी लंकेश प्रकरणात आरोपी अमित डेगवेकर याच्या जबाबवरुन राणे यांचे नाव उघड झालं आहे. काका नावाने राणे यांना ओळखलं जायचे, असं अमितने चौकशीत कबूल केलं आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातला आरोपी वीरेंद्र तावडे याने राणेंची भेट घडवली होती, अशी माहितीही डेगवेकरने दिली.

गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल 2018 मध्ये शशिकांत राणे यांचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

सनातन प्रभातच्या माजी संपादकाचे नाव समोर आल्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या चारही हत्यांमध्ये पुन्हा एकदा संशयाची सुई सनातन संस्थेवर आली आहे.