32 हजाराचा LED अडीच हजारात, गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना पाचारण

मॉलमध्ये गेल्यावर लोकांनी त्यांच्या शॉपिंग बास्केटमध्ये चार-चार टीव्ही भरले आणि काऊंटरवर पैसे देण्यासाठी पोहोचले.

32 हजाराचा LED अडीच हजारात, गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना पाचारण

फ्रान्स : जर तुम्हाला एखादा 32 हजार रुपये किंमतीचा LED टीव्ही अडीच हजारात मिळत असेल, तर तुम्ही काय कराल? नक्कीच तुम्ही तो टीव्ही घेण्यासाठी तुटून पडाल. असाच एक प्रकार फ्रान्समध्ये घडला. इथे एका शॉपिंग मॉलमध्ये 31500 रुपये किंमतीच्या एलईडी टीव्हीची किंमत फलकावर चुकीने 2,450 रुपये लिहिण्यात आली.

जर 32 हजाराचा टीव्ही अडीच हजारात मिळत असेल, तर राडा तर होणारच. या मॉलमध्येही असचं झालं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर या दुकानाचा फोटो, पत्ता आणि किंमत व्हायरल झाली. त्यानंतर या दुकानात लोकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली.

मॉलमध्ये गेल्यावर लोकांनी त्यांच्या शॉपिंग बास्केटमध्ये चार-चार टीव्ही भरले आणि काऊंटरवर पैसे देण्यासाठी पोहोचले. जेव्हा तिथल्या कर्मचाऱ्याने या ग्राहकांना या टीव्हीटी किंमत 2,450 नसून 31,500 रुपये असल्याचं सांगितलं, तेव्हा ग्राहक कर्मचाऱ्यांवर भडकले आणि महागाचा टीव्ही स्वस्तात देण्याची मागणी करु लागले. स्वस्त टीव्ही विकत घेण्यासाठी दुकानात इतकी गर्दी झाली की, अखेर दुकान मालकाला पोलिसांना बोलवावं लागलं. दुकानदारासोबतच पोलिसांनीही लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला की, ती किंमत चुकीने लिहिण्यात आली. मात्र, लोकं ऐकायला तयार नव्हते. आम्हाला कमी किमतीत टीव्ही द्या, या मागणीवर लोक अडून बसले.

दुकान बंद केल्यावरही लोकं त्या मॉलमधून बाहेर जायला तयार नव्हते. यानंतर पोलिसांनी त्या सर्व लोकांनी मॉल लवकरात लवकर रिकामं करण्याची ताकीद दिली. त्यानंतर जवळपास तासाभरानंतर हळूहळू लोकांनी ते मॉल सोडलं.

LED TV On Sale

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI