गँगस्टर रवी पुजारीला भारतात आणलं, कर्नाटक पोलिसांना मोठं यश

गँगस्टर रवी पुजारीला रविवारी रात्री उशिरा भारतात आणण्यात आलं. सीबीआयची टीम रवी पुजारीला घेऊन भारतात पोहोचली.

गँगस्टर रवी पुजारीला भारतात आणलं, कर्नाटक पोलिसांना मोठं यश
| Updated on: Feb 24, 2020 | 9:33 AM

बंगळुरु : गँगस्टर रवी पुजारीला रविवारी रात्री उशिरा भारतात आणण्यात (Ravi Pujari Brought To India) आलं. सीबीआयची टीम रवी पुजारीला घेऊन भारतात पोहोचली. गँगस्टर रवी पुजारी याला कर्नाटक येथील एका गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. रवी पुजारी हा भारताचा वॉन्टेड आरोपी आहे. त्याच्या विरोधात मुंबई, कर्नाटकसह अनेक राज्यात जवळपास 200 गुन्हे दाखल आहेत.

रवी पुजारी हा एकेकाळी छोटा राजनसोबत दाऊद गँगसाठी काम करायचा (Ravi Pujari Brought To India). मात्र ,छोटा राजनने दाऊदशी फारकत घेतल्यानंतर तो छोटा राजनसोबत गेला. मात्र, काही काळानंतर त्याने छोटा राजन याचीही साथ सोडली आणि स्वतःची गँग तयार करुन धुमाकूळ घातला.

रवी पुजारी याच्या विरोधात, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे वेगवेगळ्या राज्यात दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी कर्नाटक पोलिसांनी आकाश शेट्टी या व्यक्तीला अटक केली होती. आकाश शेट्टी हा रवी पुजारी याचा जवळचा साथीदार आहे. आकाश याच्याकडे केलेल्या तपासात कर्नाटक पोलीस रवी पुजारीच्या ठावठिकाणापर्यंत पोहचले.

रवी पुजारी हा दक्षिण आफ्रिकेतील सेनेगल येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी सीबीआयच्या आणि रॉमार्फत दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांना रवी पुजारी याला अटक करण्यास भाग पाडलं. गेल्या काही महिन्यांपासून तो दक्षिण आफ्रिकेच्या जेल मध्ये होता. यानंतर अखेर त्याला भारतात आणण्यात आलं. कर्नाटक पोलिसांच्या (Ravi Pujari Brought To India) वॉरंटवर ही कारवाई करण्यात आली आहे.