.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऊस शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

केंद्र सरकारने इंधन आणि साखरेच्या दरांत वाढ केली आहे. त्यामुळे आमची मागणी चुकीची नाही. | Raju Shetty

ऊस शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 02, 2020 | 7:20 PM
Share

कोल्हापूर: केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली तर साखरेचा एक कणही कारखान्यांतून बाहेर पडू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. ऊसतोड मजुरांना 14 टक्के वाढीव मजुरी मिळाली त्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही 14 टक्के वाढीव एफआरपी द्यावा. केंद्र सरकारने इंधन आणि साखरेच्या दरांत वाढ केली आहे. त्यामुळे आमची मागणी चुकीची नाही, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. (Raju Shetty demand to give 14 percent extra FRP to sugercane farmers)

कोल्हापुरात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या 19व्या ऊस परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. यावेळी त्यांनी ऊस उत्पादकांना 14 टक्के वाढीव एफआरपी देण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले. गेल्यावर्षीच्या तुलनेत केंद्र सरकारने एफआरपी 100 रूपयांनी वाढवला आहे. परंतु, 14 टक्क्यानुसार एफआरपीची रक्कम 382 रुपयांनी वाढली पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने किमान 200 रुपयांनी तरी एफआरपी वाढवावा.

याबाबतीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली तर कारखान्यांमधून साखरेचा एक कणही बाहेर पडू देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. तसेच यंदा शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी मिळावा. ज्या साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीचा एफआरपी अजून दिलेला नाही त्यांचे कारखाने सुरु होऊ देणार नाही, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.

यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाच्या एफआरपीसंदर्भात कोल्हापुरातील साखर कारखानदारांंशीही चर्चा केली होती. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली होती. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बैठकीतून निघून गेले. त्यामुळे ऊसदर निश्चितीसाठी आयोजित करण्यात आलेली पहिली बैठक निष्फळ ठरली. मात्र, ऊसासाठी एफआरपी वाढवून देणार नाही तोपर्यंत साखर कारखाने सुरु होऊन देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला होता.

कृषी कायद्यांविरोधात 5 नोव्हेंबरला रास्ता रोको आंदोलन येत्या 5 नोव्हेंबरला देशभरातील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे. आम्ही रस्त्यावर उतरून ठिकठिकाण रस्ता रोखून धरू. किमान दोन तास शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन करावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

अतिवृष्टीमुळे ऊसतोडणीच्या कामात अडथळे

काही दिवसांपूर्वी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतांमध्ये पाणी शिरले होते. हे पाणी अद्याप पूर्णपणे ओसरलेले नाही. परिणामी या शेतांमधील ऊस तोडणी करणे शक्य नाही. त्यामुळे सध्या रस्त्यांलगत असलेल्या शेतांमधील ऊस कापण्याचे काम सुरु आहे. मात्र, यंदाचा गाळप हंगाम अगोदरच लांबणीवर पडला आहे. दरवर्षी साधारण 15 ऑक्टोबरच्या आसपास गाळप हंगामाला सुरुवात होते. मात्र, यंदा अडचणींमुळे गाळप हंगाम अजूनही सुरु झालेला नाही. संबंधित बातम्या:

साखर कारखानदारांचा आडमुठेपणा; ऊस दर निश्चितीची पहिली बैठक निष्फळ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप

(Raju Shetty demand to give 14 percent extra FRP to sugercane farmers)

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर