AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : सोन्याच्या दरात पुन्हा घट, चांदीही स्वस्त, जाणून घ्या प्रतितोळा सोन्याचे दर

जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात मोठी घट झाली असून सोनं 500 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

Gold Rate : सोन्याच्या दरात पुन्हा घट, चांदीही स्वस्त, जाणून घ्या प्रतितोळा सोन्याचे दर
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 10, 2020 | 6:43 PM
Share

जळगाव : जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात (Gold Price Today) मोठी घट झाली असून सोनं 500 रुपयांनी स्वस्त झालं आहे, तर चांदीच्या दरात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही. सोन्याचे आजचे भाव 49 हजार रुपये प्रतितोळा (10 ग्रॅम) तर चांदीचा (Silver Price Today) आजचा दर 66 हजार 700 रुपये प्रतिकिलो इतका आहे. (Gold Silver Price today : Gold declines RS 500 rs per 10 gram)

ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याचा दर कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत सकारात्मक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. त्यांनी सोन्यातील गुंतवणूक कमी करून हा ओघ भांडवली बाजारात वळवला आहे. मागील काही दिवसांत त्यात झालेल्या नफावसुलीने सोन्याचा भाव पाच महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आला आहे.

दरम्यान, गुरुवारी दिल्लीच्या सराफा बाजारातही सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीतल्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 534 रुपयांची घट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दिल्लीत आजचा सोन्याचा दर 49 हजार 186 रुपये आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. दिल्लीत चांदीच्या किंमतीत आज 628 रुपयांची घट पाहायला मिळाली.

भारतीय बाजारात ऑगस्ट महिन्यापासून सोने जवळपास 8 हजार रुपयांनी स्वस्त झालंय. ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी 56 हजार 379 रुपये होता. आतापर्यंतचा हा सर्वाधिक भाव राहिला होता. त्याच भावात आता घसरण होऊन सोन्याचा दर 49 हजार रुपयांवर आला आहे. कोरोनाची लस (Corona Vaccine) येत असल्याच्या बातम्यांचा परिणाम सराफा बाजारावर होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

विशेष म्हणजे कोरोनाच्या कठीण (Corona Pandamic) काळानंतर आता लोकांनी दिवाळीचं (Diwali) मोठं उत्साहात स्वागत केलं. कारण, धनत्रयोदशीच्या (Dhanteras) शुभ मुहूर्तावर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याची (Gold) विक्री 30 टक्क्यांनी अधिक झाली होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये दिवाळीच्या उत्सवात लोकांनी 20,000 कोटी रुपयांच्यां सोन्याची खरेदी केली होती. IBJAच्या आकडेवारीनुसार, देशभरात धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल 40 टन सोन्याची विक्री झाली, ज्याची किंमत 20,000 कोटींच्या घरात होती.

परकीय बाजारातही घसरण

परदेशी बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतींचा कल कायम आहे. कॉमेक्सवरील सोन्याचे दर 1.80 डॉलर प्रति औंससह 1813 डॉलरवर व्यापार करीत आहेत. चांदीबद्दल बोलायचे झाल्यास प्रति औंस सुमारे 3 डॉलरची घट दिसून आली आहे. सध्या चांदी 23.15 डॉलर प्रति औंसवर व्यापार करीत आहे. लॉकडाऊन काळात सोन्याची दुकानं बंद होती, तर सोन्याचा व्यापारही ठप्प होता. पण आता मोठ्या उत्साहात मार्केट सुरू झालं आहे. अशात लग्न सराईचे दिवस आहेत. त्यामुळे सोनं खरेदीला यंदा लोकांनी जास्त पसंती दिली आहे.

दिवाळीतही लोकांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये दिवाळीच्या उत्सवात लोकांनी 20,000 कोटी रुपयांच्यां सोन्याची खरेदी केली आहे. IBJAच्या आकडेवारीनुसार, देशभरात धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल 40 टन सोन्याची विक्री झाली, ज्याची किंमत 20,000 कोटींच्या घरात आहेत. दरम्यान, सोन्याच्या किमतींनी 56,000 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. त्यानंतर आता पुन्हा भाव खाली येताना दिसत आहेत. पण कोरोनामुळे किंमत पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आताच लोकांचा सोनं खरेदीकडे कल आहे.

दागिने खरेदी करताना हॉलमार्कची खातरजमा करा

तुम्ही दागिने विकत घेत असाल तर हॉलमार्कसह दागिने घेतले आहेत ना, याची खात्री करा. कारण सोनं विकताना हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची किंमत सध्याच्या बाजारभावावर निश्चित केली जाते. म्हणून हॉलमार्कसह दागिने खरेदी करा.

इतर बातम्या :

सोनं खरेदीसाठी जाताय तर लक्षात असूद्या ‘या’ 3 गोष्टी, नाहीतर होईल नुकसान

धनत्रयोदशीला देशात तब्बल 40 टन सोन्याची विक्री, 20 हजार कोटी रुपयांची उलाढाल

(Gold Silver Price today : Gold declines RS 500 rs per 10 gram)

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत