खा. अमोल कोल्हेंच्या फेसबुक पोस्टनंतर गुगलने ‘ती’ चूक सुधारली!

| Updated on: Oct 18, 2020 | 7:58 PM

खासदार अमोल कोल्हेंच्या फेसबुक पोस्टनंतर मात्र गुगलने त्यांच्या जन्मदिवसाबाबतची चूक सुधारली आहे.

खा. अमोल कोल्हेंच्या फेसबुक पोस्टनंतर गुगलने ती चूक सुधारली!
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या चुकीच्या वाढदिवसाची नोंद गुगलवर होती. गुगलच्या चुकीमुळे त्यांना रविवारी फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला.  हा सविस्तर प्रकार फेसबुक पोस्टद्वारे मांडत त्यांनी पोस्टमधून गुगलला चिमटे काढले. अमोल कोल्हेंच्या फेसबुक पोस्टनंतर मात्र गुगलने चूक सुधारली आहे. (Google Correcting Amol Kolhe birthday After his Facebook Post)

गुगलच्या सर्चमध्ये अमोल कोल्हे यांचा वाढदिवस 18 ऑक्टोबरला असल्याचा नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे आज सकाळपासून अमोल कोल्हे यांच्यावर चाहते आणि कार्यकत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा पाऊस पडत होता. या सगळ्या प्रकारानंतर अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करत गुगलला शाब्दिक चिमटा काढला. यानंतर गुगलच्या चूक लक्षात येताच त्यांनी चुकीची दुरुस्ती केली.

आज सकाळी (18 ऑक्टोबर) फेसबुक पोस्ट करत त्यांनी गुगलला कोपरखळ्या लगावल्या. अमोल कोल्हे म्हणाले, “Google भाऊ, दोन दोन वाढदिवस पचनी पडत नाही. बरं, तिथी आणि तारीख हाही प्रकार नाही. सहज प्रश्न पडला, माझ्यासारख्या सामान्य मावळ्याची ही परिस्थिती असेल तर वर्षानुवर्षे महाराजांना काय वाटत असेल”

“आज सकाळपासून वाढदिवस शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. एकाच वर्षात दोनदा हे प्रेम अनुभवायला मिळणाऱ्या मोजक्या जणांपैकी आपण एक असल्याचे हे भाग्य आहेच. वेळात वेळ काढून अनेकजण फोनद्वारे, मेसेजद्वारे, सोशल मिडियातून शुभेच्छा देत आहेत. त्या सर्वांचा ऋणी आहे”, असंही अमोल कोल्हेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं.

गुगलने चूक दुरुस्त केल्यानंतर अमोल कोल्हेंनी आवर्जून गुगलचे आभार मानले. माझ्या जन्मदिवसाची नोंद बरोबर केल्याबद्दल Thank You Google, असं ट्विट कोल्हे यांनी केलं.

(Google Correcting Amol Kolhe birthday After his Facebook Post)

संबंधित बातमी

गुगलमुळे मला भलतंच भाग्य, अमोल कोल्हेंचा सर्च इंजिनलाच चिमटा