ग्रामसेवकांबद्दलचे वक्तव्य भोवले, राज्यभरात ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन, आ. शिरसाट यांनी विनाशर्त माफी मागण्याची अट

मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करून आमदारांना सक्त ताकीद द्यावी. ग्रामसेवकांबद्दल समाजात गैरसमज निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी केली.

ग्रामसेवकांबद्दलचे वक्तव्य भोवले, राज्यभरात ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन, आ. शिरसाट यांनी  विनाशर्त माफी मागण्याची अट
आ. शिरसाट यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरातील ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 4:36 PM

औरंगाबादः सोमवारी शहरात झालेल्या महिला सरपंच परिषदेत बोलताना शिवसेना आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsaat) यांची जीभ घसरली आणि त्यांनी ग्रामसेवकांच्या बाबतीत बोलताना अपशब्द काढले. मात्र यावरून राज्यभरातील ग्रामसेवकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या वक्तव्याचा निषेध केला आहे. आज राज्यभरातील ग्रामसेवकांनी (Gramsevak Agitation) एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले. तसेच आमदार संजय शिरसाट यांनी समस्त ग्रामसेवक वर्गाची माफी मागावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली. तसेच समाजात ग्रामसेवकांबद्दल गैरसमज निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल शिरसाट यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही ग्रामसेवकांच्या वतीने करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते आमदार शिरसाट?

औरंगाबादमध्ये सोमवारी महिला सरपंच परिषद झाली. यावेळी बोलताना आमदार संजय शिरसाट म्हणाले, ‘एक लक्षात ठेवा, सगळ्यात भामटा माणूस असेल तर तो ग्रामसेवक आहे. तो तुम्हाला कधी मूर्ख बनवेल, हे सांगता येत नाही. तो तुमचे ऐकतो असे दाखवेल, पण बाहेर गेल्यास सरपंचांच्या सांगण्यावरून केले असे सांगत स्वतःच्या अंगावर काही येऊ देत नाही.’ त्यामुळे महिला सरपंचांनी त्यांच्यापासून दूर रहावं, असा सल्ला आमदार शिरसाट यांनी यावेळी दिला.

अनुभवावरून केले वक्तव्य…

ग्रामसेवकांबद्दल आपण असे वक्तव्य का केले, असा प्रश्न आमदार शिरसाट यांना पत्रकारांनी विचारला. तेव्हा मात्र शिरसाट यांनी सारवासारव केली. काही ग्रामसेवक चांगले काम करत असतील मात्र मला आलेल्या अनुभवावरून मी ते वक्तव्य केले. यावर मी ठाम आहे, असेही आमदार शिरसाट म्हणाले. त्यामुळे राज्यभरातील ग्रामसेवकांनी शिरसाट यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आज मंगळवारी राज्यभरातील ग्रामसेवकांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन केले.

आ. शिरसाट यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

आमदार शिरसाट यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे राज्यभरातील ग्रामसेवकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयात आम्ही 27 हजार 536 ग्रामपंचायतींचं कामकाज ठप्प झालेलं आहे. त्यांनी विनाशर्त माफी मागावी. मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करून आमदारांना सक्त ताकीद द्यावी. ग्रामसेवकांबद्दल समाजात गैरसमज निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी केली.

इतर बातम्या-

Crime: ऐन दिवाळीत प्रियकराला हाताने पाजलं विष, पैशांची मागणी पूर्ण न केल्याचं कारण, जालन्यात प्रेयसीचं कृत्य

लिटिल चॅम्प्सच्या गाण्याने उषा मंगेशकर प्रभावित, लता दीदींना केली चिमुकल्यांची गाणी ऐकण्याची विनंती!