नवी मुंबईत 50 लाख रुपयांचा गुटखा जप्त, 4 जणांना अटक

| Updated on: Oct 09, 2020 | 6:56 PM

नवी मुंबईच्या अंमली विरोधी पथकाने महापे एमआयडीसी येथील ओयो सिल्व्हर हॅाटेल समोरील मोकळ्या जागेवर गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला आहे.

नवी मुंबईत 50 लाख रुपयांचा गुटखा जप्त, 4 जणांना अटक
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबईच्या अंमली विरोधी पथकाने महापे एमआयडीसी येथील (Gutka Worth Rs 50 Lakh Seized) ओयो सिल्व्हर हॅाटेल समोरील मोकळ्या जागेवर गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला आहे. तब्बल 50 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून चार जणांना अटक केली आहे (Gutka Worth Rs 50 Lakh Seized).

हा गुटखा गुजरात येथून नवी मुंबईमध्ये विक्रीसाठी आला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गुटख्याचे 94 हून अधिक बोचकी आयशर टेम्पोमधून इतर गाड्यांमध्ये पलटी करण्यात येत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकाऱ्याला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधबंते यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम महापे एमआयडीसी परिसरात ओयो सिल्व्हर हॅाटेल समोरील मोकळ्या जागेवर आयशर या वाहनांतील विमल गुटखा बोलेरो पिकअप वाहनात विमल गुटखा ठेवून देवाणघेवाण सुरु होती.

याप्रकरणी जितेंद्र दास, प्रियव्रत अभयकुमार दास, मुन्ना श्रीजनार्दन यादव ,अखेय बुद्धदेव खोंडा या चौघांना अटक करण्यात आली असून चालक फरार झाला आहे. या ट्रक मधून एकूण 49,53,312 लाखांचा असलेला गुटखा टेम्पोसह हस्तगत केला आहे. याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन दिली.

याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये अजून कोणाचा समावेश आहे का? कोणाला विकला जाणार होता?, याचा पोलीस तपास करत आहेत.

Gutka Worth Rs 50 Lakh Seized

संबंधित बातम्या :

नाशकातून ISI एजंटला अटक, 19 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

40 रुपयांसाठी मित्राचा गळा दाबला; तरुणाचा गुदमरुन मृत्यू, कोल्हापुुरातील धक्कादायक घटना