वर्ध्यात गारपीट, हरभरा आणि गव्हाच्या पिकांचं मोठं नुकसान, तर नाशकात पारा घसरला

वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील काही गावांमध्ये मध्यरात्री गारपीट झाली. या गारपिटीमुळे शेतकऱ्याचा हरभरा आणि गव्हाच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

वर्ध्यात गारपीट, हरभरा आणि गव्हाच्या पिकांचं मोठं नुकसान, तर नाशकात पारा घसरला
| Updated on: Mar 14, 2020 | 11:10 AM

वर्धा/नाशिक : वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर (Hailstorm At Wardha) तालुक्यातील काही गावांमध्ये मध्यरात्री गारपीट झाली. या गारपिटीमुळे शेतकऱ्याचा हरभरा आणि गव्हाच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे (Hailstorm At Wardha) परिसरातील अनेक झाडांची पडझड झाली. तर गारपिटीत पक्ष्यांचा मृत्यू झाला. वर्धा तालुक्यातील गिरड, शिवणफळ, आर्वी, मोहगाव, धोंडगाव, येदलाबाद, भवानपूर परिसरात मोठं नुकसान झालं.

नाशकात पारा घसरला

नाशकातील निफाडमध्ये पारा घसरला. उन्हाळ्याच्या सुरुवातीला निफाडमध्ये 7.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

भारत-पाकिस्तानच्या सीमेवर गुजरात आणि राजस्थान राज्यावर जमिनीपासून 1,500 मीटरवर, तर दुसरी 5,500 मीटर दरम्यान वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडून राज्यावर थंडगार वारे वाहत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या निफाड तालुक्याचा पारा घसरला आहे.

कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात आज 7.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. गारठाणाऱ्या थंडीपासून उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी (Hailstorm At Wardha) शेकोट्या पेटवल्याचे पाहायला मिळाले.

संबंधित बातम्या :

कर्जमाफी झाली, अंगठ्याचा गोंधळ कायम, ‘आधार’च्या घोळानं कर्जमाफीची वाट बिकट

राज्यभरात अवकाळी पावसाची हजेरी, नाशिकसह इतर ठिकाणी गारपीटीनं शेतीचं मोठं नुकसान

ट्रम्प दाम्पत्याला गांधीटोपी, उपरणे, साडी आणि कांदे, नाशिकच्या शेतकऱ्याची कांदा दरासाठी अनोखी शक्कल

‘कृषी मंत्री एक दिवस शेतावर’, दादा भुसेंचा अनोखा उपक्रम, गावात कृषी अधिकारी येतात का? शेतकऱ्यांना विचारणा