Hanuman Chalisa : आयुष्यातील अडथळे कमी करायचे आहेत ? मग रोज हनुमान चालीसा पठण करा

| Updated on: Dec 07, 2021 | 2:12 PM

हिंदू धर्मामध्ये पवनपुत्र हनुमानाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. अडचणीच्या काळात हनुमान आपल्या भक्तांसाठी धावत येतात अशी मान्यता आहे.

Hanuman Chalisa : आयुष्यातील अडथळे कमी करायचे आहेत ? मग रोज हनुमान चालीसा पठण करा
Hanuman
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मामध्ये पवनपुत्र हनुमानाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. अडचणीच्या काळात हनुमान आपल्या भक्तांसाठी धावत येतात अशी मान्यता आहे. हिंदू पुराणात हनुमान भगवान शंकराचे अवतार आहेत असे मानले जाते. हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी तुलसीदासजींनी हनुमान चालीसा रचल्या. हनुमान चालीसाच्या पठणाने आपल्या आयुष्यातील दु:ख कमी होतात. तुलसीदासांनी बंदीगृहात ठेवण्यात आले होते. तेव्हा त्यांनी हनुमान चालीसा 40 दिवसामध्ये रचल्या होत्या.

हनुमान चालीसा वाचण्याची उत्तम वेळ
पुराणाच्या मते हनुमान चालीसा सकाळी किंवा संध्याकाळी वाचू शकता. सकाळी आंघोळ करून नंतर हनुमान चालीसाचे पठण करावे. जर तुम्हाला संध्याकाळी वाचायचे असेल तर तुम्ही स्वच्छ अंघोळ करुन याचे पठण करु शकता.

  • हनुमान चालीसा पठणाचे फायदे
    जर तुम्हाला वाईट आत्म्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर हनुमान चालिसाचा पाठ करणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. त्याच प्रमाणे हनुमान चालीसा उशीखाली ठेवल्यानेही फायदा होतो. त्यातील एक श्लोक असा आहे की, “भूत पिशक नाही आयेवे महावीर जब नाम सुनावे” याचा अर्थ भगवान हनुमानाचे नाव घेणाऱ्या भक्तावर कोणताही वाईट आत्मा प्रभाव पाडू शकत नाही.
  • हनुमान जी तुम्हाला तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडथळ्यांवर मात करण्यास मदत करतात. जर तुम्ही पूर्ण भक्तिभावाने त्यांची प्रार्थना केली तर भगवान हनुमान तुमच्या मार्गातील सर्व अडथळे नष्ट करतील. जर तुमचे मन अस्वस्थ असेत तर हनुमान चालीसाचे पठण नक्की करा. यामुळे तुम्ही दिवसभर आनंदी राहू शकाल.
  • कोणत्याही प्रवासापूर्वी हनुमान चालीसाचे पठण केल्याने कोणताही अपघात होत नाही अशी मान्याता आहे.त्यामुळे कोणत्याही प्रवासाची सुरुवात तुम्ही हनुमान चालीसाने करु शकता.
  • पूर्ण भक्तिभावाने हनुमान चालीसाचे पठण केल्याने तुम्हाला अद्भुत शक्ती मिळते. यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहते.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या

Panchak Rules | पंचक म्हणजे काय? काय आहेत त्याचे नियम

Study Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? मग वास्तुत हे बदल नक्की करा

Hanuman Puja benefits : मनोभावे पूजा करा, संकटमोचक स्वत: मदतीला येतील