जवानांच्या पार्थिवाला गृहमंत्री राजनाथ सिंहांचा खांदा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

मुंबई: पुलावामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला.  या हल्ल्यात जवळपास 40 जवान शहीद झाले आहेत. महाराष्ट्राच्या बुलडाण्यातील दोन जवानांचाही यामध्ये समावेश आहे. या हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानला या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. […]

जवानांच्या पार्थिवाला गृहमंत्री राजनाथ सिंहांचा खांदा
Follow us on

मुंबई: पुलावामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला.  या हल्ल्यात जवळपास 40 जवान शहीद झाले आहेत. महाराष्ट्राच्या बुलडाण्यातील दोन जवानांचाही यामध्ये समावेश आहे. या हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानला या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. तर भारताच्या परराष्ट्र खात्याने पाकिस्तानी उच्चायुक्तांना नोटीस बजावली आहे. त्याचवेळी देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह हे जम्मू काश्मीरमधील पुलवामात दाखल झाले.

राजनाथ सिंह यांनी जवानांच्या पार्थिवाला स्वत: खांदा दिला. एखाद्या गृहमंत्र्याने शहीद जवानांच्या पार्थिवाला खांदा देण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. राजनाथ सिंह यांनी श्रीनगरमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली दिली. त्यानंतर जवानांचं पार्थिव तिरंग्यात लपेटून त्यांच्या त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आलं. मात्र त्याआधी जवानांसह राजनाथ सिंह यांनी शहिदांना अखेरचा सलाम करत, त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. यावेळी वीर जवान तुझे सलाम, भारत माता की जय अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला.

पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं

मी देशाला शब्द देतो, त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांना त्यांची शिक्षा नक्कीच मिळेल, जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ,अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिली. हल्लेखोरांना मोठी किंमत चुकवावीच लागेल. पुलवामा हल्ल्यामागे जी शक्ती आहे, त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळणारच, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या

पुलवामा हल्ल्यानंतर मोदींकडून पाकिस्तानला 10 इशारे  

Pulwama Attack: माझा शब्द आहे, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ : मोदी 

“आणखी एका मुलाला सैन्यात पाठवेन, पण पाकला धडा शिकवा”  

Pulwama Attack : मास्टरमाईंड आदिल अहमद दार नेमका कोण?