
विवाहानंतर तब्बल बारा वर्षांनी पहिलेच अपत्य झाले. विशेष म्हणजे पहिलेच अपत्य जुळ्या मुली झाल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी कुटुंबाने संपूर्ण हॉस्पिटलला विद्युत रोषणाईने सजवून आनंद साजरा केला.

या हॉस्पिटलमधील ज्या वॉर्डमध्ये जन्म झाला तो वॉर्ड, पायऱ्याही फुलांनी आणि फुग्याने सजवून टाकण्यात आल्या आहेत.

शिर्डीतील कोते दाम्पत्याने अशा अनोख्या पद्धतीने स्त्री जन्माचे स्वागत केल्याने सर्वच स्तरातून कोते कुटुंबाचे कौतुक केले जात आहे.

बिपीन आणि निलिमा कोते हे दांम्पत्य गेल्या 12 वर्षापासून नवीन पाहुण्याच्या आगमनाची वाट पाहत होते आणि तो दिवस उजडला. निलिमा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला.

कोते कुटुंबीय हे साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत. दर गुरुवारी निघणाऱ्या साईबाबांच्या पालखीचा मान या कुटुंबास आहे.