चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न

पतीने पत्नीला रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरच्या शांतिनगर परिसरात घडली (Husband set blazed wife on character issue) आहे.

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न


ठाणे : पतीने पत्नीला रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरच्या शांतिनगर परिसरात घडली (Husband set blazed wife on character issue) आहे. चारित्र्यांच्या संशयावरुन पतीने पत्नीला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पीडित महिला 40 ते 45 टक्के भाजली आहे. मनोज यादव असं पतीचे (Husband set blazed wife on character issue) नाव आहे.

पती-पत्नीमध्ये सतत वादविवाद होत होते. यातूनच 28 जानेवारीला मनोज याने आपल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकूत तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मनोजची पत्नी 40 ते 45 टक्के भाजली आहे. सध्या तिला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातून मुंबईच्या जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर उल्हासनगर पोलीस ठाण्यात मनोजच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI