Maratha Reservation ! मला चर्चेला बोलवा, एका महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवेल; हरिभाऊ राठोड यांचा दावा

| Updated on: Oct 13, 2020 | 12:42 PM

सरकारने मला चर्चेची संधी दिली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मी एका महिन्यात सोडवून दाखवेन, असं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलं आहे.

Maratha Reservation ! मला चर्चेला बोलवा, एका महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवेल; हरिभाऊ राठोड यांचा दावा
बंजारा समाजाकडून येत्या 27 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती हरिभाऊ राठोड यांनी दिली. भालचंद्र नेमाडे यांच्या 'हिंदू' या कादंबरीवर बंदी घालावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
Follow us on

मुंबई: माझ्याकडे मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला आहे. पण सरकार माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे. मला चर्चेची संधी दिली तर एका महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवेल, असा दावा बंजारा समाजाचे नेते, माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी केला. ( Haribhau Rathod on maratha reservation )

प्रसारमाध्यमांशी बोलताना हरिभाऊ राठोड यांनी हा दावा केला. माझ्याकडे आरक्षणाचा फॉर्म्युला आहे. पण सरकार माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे. मला चेष्टेचा विषय केलं जात आहे. हे ओबीसी आणि मराठ्यांचं दुर्देव आहे. मला चर्चेची संधी दिली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मी एका महिन्यात सोडवून दाखवेन, असं राठोड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून राठोड यांनी यापूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. मराठा आरक्षण देता येत नसेल तर सगळंच आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, अशी मागणी राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. त्यांच्या याच मागणीचा माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी समाचार घेतला होता. उदयनराजेंचं वक्तव्य देशात पुन्हा राजेशाही आणणारं आहे, अशी टीका राठोड यांनी केली होती.

“आम्ही बहुजन समाजाची लोकं नेहमीच छत्रपतींच्या आदर करतो मात्र खासदार महोदयच असं जर बोलायला लागले तर असं वाटतं की त्यांना परत राजेशाही आणायची आहे. ते यापूर्वीही अनेकदा बोलले आहेत की लोकशाही नको राजेशाही आणा. मग राजेशाहीच आणायची असेल तर आम्हाला देखील विचार करावा लागेल की संविधानाला मानणारे कोण आणि संविधानविरोधी कोण?”, असं राठोड म्हणाले होते.

तर, “मराठा समाजातील मुलांना चांगले गुण मिळूनही अ‍ॅडमिशन मिळत नाही, मात्र इतर समाजात कमी गुण असतानाही प्रवेश मिळतो. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली, आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करुन, मार्क असूनही अ‍ॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे”, अशी खंत उदयनराजेंनी साताऱ्यात बोलताना व्यक्त केली होती. ( Haribhau Rathod on maratha reservation )

संबंधित बातम्या:

उदयनराजेंना परत राजेशाही आणायची आहे काय?, हरिभाऊ राठोडांचा सवाल

सर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी

क्रांती होऊन लोक नेत्यांना मारुन टाकतील, मराठा समाज नेत्यांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लावेल : उदयनराजे

( Haribhau Rathod on maratha reservation )