Lockdown : दारुबंदी असलेल्या वर्ध्यात नदीपात्रात दारुनिर्मिती, 7 लाखांचे दारुचे साहित्य नष्ट

| Updated on: Apr 22, 2020 | 4:22 PM

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान जीवनावश्यक वस्तू सोडून इतर सर्व वस्तूंच्या सेवा बंद (illegal alcohol selling in wardha during lockdown) आहेत.

Lockdown : दारुबंदी असलेल्या वर्ध्यात नदीपात्रात दारुनिर्मिती, 7 लाखांचे दारुचे साहित्य नष्ट
Follow us on

वर्धा : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान जीवनावश्यक वस्तू सोडून इतर सर्व वस्तूंच्या सेवा बंद (illegal alcohol selling in wardha during lockdown) आहेत. त्यामुळे राज्यात अवैध प्रकारे दारुची विक्री आणि निर्मिती होत असल्याचे समोर आले आहे. वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असली तरी तेथे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध दारुची निर्मिती आणि विक्री होत आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने यावर कारवाई (illegal alcohol selling in wardha during lockdown) केली आहे. या कारवाई दरम्यान दारु निर्मात्यांनी पोलीस येताच तेथून पळ काढला. पोलीस दारु निर्मात्यांचा शोध घेत आहेत.

लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात वर्ध्यात दारुची विक्री आणि निर्मिती सुरु होती. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. शाखेने कारवाई करत सात लाख 15 हजाराचे साहित्य नष्ट केलं. विशेष म्हणजे ही दारु निर्मिती वर्ध्यातील नदीकाठच्या झुडपात सुरु असल्याचे समोर आले.

वर्ध्यातील सेलू तालुक्याच्या घोराड, सेलू, हिंगणी या भागात दारू निर्मिती सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली. यात 3 चालू दारूच्या भट्ट्या, 115 लोखंडी ड्रम, 1200 लिटर रसायन मिळून आले आहे. पोलिसांनी हे साहित्य नष्ट करत कारवाई केली. मात्र पोलिसांच्या येण्याची चाहूल लागताच आरोपींनी तेथून पळ काढला.

दारू निर्माते हे संचारबंदीतही मोठ्या प्रमाणात दारू निर्मिती करुन विकत आहेत. स्थानिक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने वर्धेच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून यांच्यावर कारवाई केली जात आहे. मात्र हे निर्माते दररोज वेगवेगळे ठिकाण शोधत दारू निर्मिती करत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.

संबंधित बातम्या : 

तोंडाचा वास घेण्याची भीती, ब्रेथ अॅनलायझरही नाही, ‘कोरोना’मुळे दारुडे ड्रायव्हर फोफावले

Lockdown : लॉकडाऊनमध्ये तळीरामांची पंचाईत, घरात दारु कशी बनवावी?, गुगलवर ट्रेंड