मुंबईसह 16 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

| Updated on: Oct 10, 2020 | 5:26 PM

मुंबईसह 16 जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मुंबईसह 16 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
pune rain
Follow us on

मुंबई: पुढच्या काही तासांसाठी मुंबईसह 16 जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी करण्यास जाऊ नये आणि शेतकऱ्यांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी केले आहे.  (IMD warns heavy rainfall in sixteen district of maharashtra including mumbai)

11 ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोवा , विदर्भाच्या काही भागात जोरदार पावसांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 16 जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मच्छिमारी करम्यासाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आलं आहे.

पुढच्या काही तासांसाठी मुंबईसह 16 जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे. पुण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. ठाणे, मुंबईतही वातावरण ढगाळ दिसून आले. पुढच्या 3 ते 4 तासांत रायगड, रत्नागिरी ,पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

येत्या दोन दिवसातील पावसाच्या काळात शेतक-यांनीही योग्य ती काळजी घ्यावी, असं हवामान विभाकडून सांगण्यात आलं आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेशासह मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान आंध्र प्रदेश, रायलसीमा, तामिळनाडुसह विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ईशान्य मॉन्सूनची चाहूल लागली असून आसाम, मेघालय परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Rain | मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूरपर्यंत जोरदार पाऊस

Hingoli Rain | हिंगोलीत मुसळधार पाऊस, शेतीचं नूकसान

(IMD warns heavy rainfall in sixteen district of maharashtra including mumbai)