AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain | मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूरपर्यंत जोरदार पाऊस

राज्यातील विविध जिल्ह्यात परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे. खरिप हंगामातील पिके काढण्याची कामं सुरु असताना पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली.

Maharashtra Rain | मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूरपर्यंत जोरदार पाऊस
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Oct 10, 2020 | 4:47 PM
Share

मुंबई : राज्यात मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूर, वाशिम-हिंगोलीपर्यंत जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. खरिप हंगामातील पिके काढण्याची कामं सुरु असताना पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. सोयाबीन, भात काढणी सुरू असताना झालेल्या पावसामुळं पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, वाशिम, हिंगोली जिल्ह्यात पाऊस झाला. (Rain starts in various district of Maharashtra)

नवी मुंबईसह पनवेल मध्ये पावसाची हजेरी

आज दुपारी नवी मुंबईसह पनवेलमध्ये मेघगर्जनेसह पावासाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्याप्रमाणे आज पावसानं हजेरी लावली. पनवेल, उरण विभागात अनेक ठिकाणी भात कापणीसाठी तयार झाले आहे. यावेळी जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे भातशेतीचे फार मोठे नुकसान होणार आहे.नवी मुंबईमध्येही विजेच्या गडगडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली.

पश्चिम महाराष्ट्रात पावसाची हजेरी

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पाऊस झाला. पुण्यात जोरदार पाऊस झाला. गेल्या दोन तीन दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.  कोल्हापूरमधील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. प्रचंड मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने तारांबळ नागरिकांची तारांबळ उडाली आहे. वाढत्या उकाड्यामुळं सकाळपासून नागरिक हैराण झाले होते त्यांना पावसामुळे दिलासा मिळाला.

सांगली शहर परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानक पडलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सोलापूर शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली.

औरंगाबाद

औरंगाबादमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली. औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली. दुपारी अर्धा तासापासून औरंगाबाद शहरात जोरदार पाऊस कोसळत होता. सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर औरंगाबाद शहरात पावसाने हजेरी लावली. खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरु असताना परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळं पिकांचं नुकसान झाल्यानं पून्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची शक्यता आहे.

हिंगोली

हिंगोली जिल्ह्यात 15 दिवसाच्या विश्रांती नंतर काही भागात पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतऱ्यांची धावपळ झाली. शेतकऱ्यांनी कापून टाकलेल्या सोयाबीनचं नुकसान होणार आहे.

वाशिम

वाशिम जिल्ह्यात रिसोड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. एका दिवसाच्या विश्रांती नंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान होणार आहे.

संबंधित बातम्या :

Hingoli Rain | हिंगोलीत मुसळधार पाऊस, शेतीचं नूकसान

Mumbai Rains | मुंबईत 48 तासात 240 मिमी पाऊस, हळूहळू मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर

(Rain starts in various district of Maharashtra)

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...