Mumbai Rains | मुंबईत 48 तासात 240 मिमी पाऊस, हळूहळू मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर

मुंबईत आज मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल. काल झालेला पाऊस हा परतीचा पाऊस नसून मान्सुनच होता.

Mumbai Rains | मुंबईत 48 तासात 240 मिमी पाऊस, हळूहळू मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर

मुंबई : मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांचे हाल झाले (Mumbai Rains Situation). या पावसामुळे संपूर्ण मुंबई जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं होतं. मुंबईत गेल्या 48 तासात तब्बल 240 हून जास्त मिमी पावसाची नोंद झाली आहे आणि आजही पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे (Mumbai Rains Situation).

मुंबईत आज मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल. काल झालेला पाऊस हा परतीचा पाऊस नसून मान्सुनच होता. आज संध्याकळपासून पावसाचा जोर ओसरणार, अशी माहिती आएमडीने दिली आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईच्या किंग्ज सर्कल, माटूंगा परिसरात कमरेपर्यंत पाणी भरलं होतं. त्यामुळे दुकानदारांनी त्यांची दुकानं आजही बंदच ठेवली आहेत. दोन्ही बाजूंची वाहतूक सध्या सुरु आहे, तर मनपाकडून रस्त्यावर साचलेला गाळ काढण्याचं काम सुरु झालं आहे.

कालच्या भयानक पावसानंतर मुंबईचे जनजीवन पुन्हा सुरळीत झालं आहे. मंगळवारी रात्री आणि बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले होते आणि मुंबई बुडाली होती. दादर टीटी सर्कल पाण्याखाली गेलं होत. पण आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दादर परिसरात वाहतूक व्यवस्था आणि दुकान पूर्ववत सुरु झाली आहे (Mumbai Rains Situation).

दामोदर नाट्यगृहाचा रंगमंच पाण्यात

गिरणगावातील परळ-लालबाग परिसर टॉवरच्या आधुनिक जगात प्रवेश करत असताना मराठी माणसाची सांस्कृतिक भूक भागवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दामोदर नाट्यगृहाचा रंगमंच बुधवारी पाण्यात बुडाला होता.

नाट्यगृहातील ज्या खुर्च्यांवर बसून नाट्यविष्काराचा आस्वाद प्रेक्षकांनी घेतला; त्या खुर्च्या साचलेल्या पावसाच्या पाण्यात बुडाल्या होत्या. अगदी निश्चित सांगायचे झाले तर रंगमंचापासूनच्या पहिल्या पाच रागांवर पाणी विराजमान होते. करोनाच्या संकटकाळात अगोदरच गेल्या सहा महिन्यांपासून नाट्यगृहाची किंबहुना नाट्यसृष्टीची आर्थिक बाजू ढासळली असताना पावसाने नुकसानीत अधिक भर घातली आहे (Mumbai Rains Situation).

संबंधित बातम्या :

Mumbai Rains | नायर हॉस्पिटलमध्ये गुडघाभर पाणी, ओपीडीत पाणी शिरल्याने दाणादाण

Mumbai Rains : मुंबईतील रस्ते जलमय, रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक कोलमडली

Mumbai Rains | तुफान पावसाने मुंबईची दाणादाण, मुंबईत सुट्टी जाहीर, आयुक्त इक्बाल चहल यांची घोषणा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *