Mumbai Rains | नायर हॉस्पिटलमध्ये गुडघाभर पाणी, ओपीडीत पाणी शिरल्याने दाणादाण

पावसाचं पाणी आत शिरल्यामुळे नायर रुग्णालयातील साहित्य पाण्यावर तरंगतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

Mumbai Rains | नायर हॉस्पिटलमध्ये गुडघाभर पाणी, ओपीडीत पाणी शिरल्याने दाणादाण

मुंबई : मुंबईत रात्रभर झालेल्या तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबई सेंट्रल परिसरातील नायर हॉस्पिटलच्या ओपीडीत पाणी शिरल्याने रुग्णालय प्रशासनाची दाणादाण उडाली. तर सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरुन नागरिकांची त्रेधा उडाली. (Mumbai Nair Hospital flooded following heavy rainfall)

मुसळधार पावसामुळे मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे या भागाला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि लोकलही पूर्णपणे कोलमडली आहे.

नायर हॉस्पिटल परिसरात गुडघाभर पाणी साचलं. पावसाचं पाणी आत शिरल्यामुळे रुग्णालयातील साहित्य पाण्यावर तरंगतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. नायर रुग्णालय हे कोव्हिड रुग्णालय घोषित करण्यात आले आहे.

हिंदमाता परिसरात नेहमीप्रमाणे पाणी साचून वाहतूक कोलमडली आहे. रस्त्यारस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत. तर बेस्ट बसची वाहतूकही वळवण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत मुंबई शहरात 173 मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. (Mumbai Nair Hospital flooded following heavy rainfall)

मुंबईत तुफान पावसामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहन महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केले आहे

संबंधित बातम्या :

तुफान पावसाने मुंबईची दाणादाण, मुंबईत सुट्टी जाहीर, आयुक्त इक्बाल चहल यांची घोषणा

नायर रुग्णालयात पावसाचे पाणी, अत्यावश्यक सेवा वगळता कार्यालयांना सुट्टी

(Mumbai Nair Hospital flooded following heavy rainfall)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *