Nitish Kumar News and Updates: बिहारमध्ये पुन्हा NDAचं सरकार आल्यास नितीश कुमार नवा विक्रम रचणार!

| Updated on: Nov 10, 2020 | 1:37 PM

बिहारमध्ये नितीश कुमार यांचा JDU आणि भाजप महायुतीला बहुमत मिळालं, तर नितीश कुमार एक नाव विक्रम बनवतील. बिहारचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री बनण्याची संधी नितीश कुमार यांच्याकडे आहे.

Nitish Kumar News and Updates: बिहारमध्ये पुन्हा NDAचं सरकार आल्यास नितीश कुमार नवा विक्रम रचणार!
Follow us on

पाटणा: बिहार विधानसभा निवडणूक (Bihar assembly election) निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री आणि JDU चे सर्वेसर्वा नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या भविष्याचा फैसलाही आज लागेल. अशावेळी नितीश कुमार यांचा JDU आणि भाजप महायुतीला बहुमत मिळालं, तर नितीश कुमार एक नाव विक्रम बनवतील. बिहारचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री बनण्याची संधी नितीश कुमार यांच्याकडे आहे. यापूर्वी हा विक्रम बिहारचे पहिले मुख्यमंत्री कृष्ण सिंह यांच्या नावावर आहे. (If NDA comes to power in Bihar again, Nitish Kumar will set a new record)

बिहारने आतापर्यंत 5 दिवसांपासून ते 14 वर्षापर्यंतचे मुख्यमंत्री पाहिले आहेत. कृष्ण सिंह यांच्या नावावर बिहारमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम आहे. कृष्ण सिंह 1946 ते 1961 पर्यंत बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांना आधुनिक बिहारचा शिल्पकार असं बोललं जातं. कृष्ण सिंह हे 14 वर्षे 304 दिवस मुख्यमंत्रीपदी विराजमान होते. आता बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या JDU आणि भाजपला बहुमत मिळालं तर नितीश कुमार यांच्याकडे सर्वाधिक काळ मु्ख्यमंत्री बनण्याची संधी आहे. नितीश कुमार यांनी आतापर्यंत 14 वर्षे 67 दिवस मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे. तर माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे 7 वर्षे बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाचा इतिहास

नितीश कुमार पहिल्यांदा 4 मार्च 2000 ते 10 मार्च 2000 दरम्यान अवघ्या 7 दिवसांचे मुख्यमंत्री राहिले होते. त्यानंतर नितीश कुमार 24 नोव्हेंबर 2005 ते 24 नोव्हेंबर 2010 पर्यंत भाजपसोबत बिहारच्या मुख्यमंत्रीपदी होते. 2010 मध्ये बिहारच्या जनतेनं पुन्हा एकदा नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं. मात्र, कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत जीतन राम मांझी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती. 2015 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा बिहारची कमान सांभाळली आणि आतापर्यंत मुख्यमंत्रीपदी राहिले आहेत.

नितीश कुमार यांची राजकीय वाटचाल

नितीश कुमार हे ६ वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. नितीश कुमार यांनी 2004 मध्ये शेवटची निवडणूक लढवली होती. ज्यात त्यांनी नालंदामधून विजय मिळवला होता. त्यानंतर नितीश कुमार यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. 2005 मध्ये नितीश कुमार NDAची सत्ता आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत बिहार विधान परिषदेचे सदस्यता स्वीकारली.

नितीश कुमार यांनी 1977 मध्ये आपली पहिली निवडणूक लढवली होती. त्यांनी नालंदाच्या हरनौत मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी 4 वेळा निवडणूक लढली. त्यात 1977 आणि 1980 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर 1985 आणि 1995 च्या निवडणुकीत ते विजयी झाले होते.

नितीश कुमार यांनी 1972 मध्ये बिहार इंजीनिअर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी काही काळ बिहार स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डात नोकरीही केली होती. मात्र, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहियांसारख्या नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

संबंधित बातम्या:

नितीश कुमार आणि पंतप्रधान मोदी हेच बिहारच्या पराभवाचे वाटेकरी, धैर्यशील मानेंचा हल्लाबोल

BREAKING | ‘ही माझी शेवटची निवडणूक!’, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून राजकीय संन्यासाची घोषणा

If NDA comes to power in Bihar again, Nitish Kumar will set a new record