भाजप हा मुस्लीम विरोधी पक्ष; मात्र 2014 मध्ये भाजपला न मागता पाठिंबा कोणी दिला? शरद पवारांचे नाव न घेता हर्षवर्धन पाटलांची टीका

| Updated on: May 08, 2022 | 10:50 PM

2014 मधील सरकारच्या पाठिंब्याविषयी सांगत असताना ते म्हणाले की, भाजप हा मुस्लिम विरोधी पक्ष आहे अशी नेहमी भूमिका मांडायची मात्र 2014 साली भाजपला न मागता पाठिंबा कोणी दिला..? असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला

भाजप हा मुस्लीम विरोधी पक्ष; मात्र 2014 मध्ये भाजपला न मागता पाठिंबा कोणी दिला? शरद पवारांचे नाव न घेता हर्षवर्धन पाटलांची टीका
शरद ववार, अजित पवार यांचे नाव न घेता टीका
Image Credit source: twitter
Follow us on

इंदापूर: भाजप हा मुस्लीम विरोधी पक्ष आहे अशी नेहमी भूमिका मांडायची मात्र 2014 साली भाजपला न मागता पाठिंबा कोणी दिला..?, 2019 मध्ये त्या 54 आमदारांच्या सह्यांचे पत्र पहाटे तीन वाजता कोण घेऊन गेले होते..? आणि भाजप (BJP) हा जर एका समाजाच्या विरोधात आहे तर तो पहाटे तीन वाजताचा शपथ विधी कसा झाला…? अशी नाव न घेता जोरदार टीका हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्यावर केली आहे. तुम्हाला सत्ता घ्यायची म्हटले तर भाजप पक्ष चांगला आणि दुसऱ्यांची मते फोडायची म्हटले तर भाजप पक्ष वाईट असा मुद्दा उपस्थित करुन त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर जोरदार हल्ला चढवत त्यांनी नाव न घेता आज पहिल्यांदाच टीका केली.

भाजप हा मुस्लिम विरोधी पक्ष

या बोलताना त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची नावं न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढविला. यावेळी त्यांनी 2014 मधील सरकारच्या पाठिंब्याविषयी सांगत असताना ते म्हणाले की, भाजप हा मुस्लिम विरोधी पक्ष आहे अशी नेहमी भूमिका मांडायची मात्र 2014 साली भाजपला न मागता पाठिंबा कोणी दिला..? असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला. 2019 मध्ये त्या 54 आमदारांच्या सह्यांचे पत्र पहाटे तीन वाजता कोण घेऊन गेले होते..? असे म्हणत त्यानी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.

भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण

इंदापूर येथे राधिका रेसिडेन्शिअल क्लबमध्ये इंदापूर तालुका भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थित झाला. त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शांत व संयमी राजकीय नेते

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सहसा स्वतःहून कधीच पवारांवर टीका करत नाहीत, ते शांत व संयमी राजकीय नेते असल्याची ओळख इंदापूर सह अख्ख्या महाराष्ट्रात आहे. मात्र सध्या पाटील हे आक्रमक व ॲक्शन मूडमध्ये असल्याचं दिसून येत आहे.

देशामध्येही सर्वात जास्त सदस्य संख्या

भाजपा हा जनहिताची कामे करणारा व तळागाळापर्यंत पोचलेला जगामध्ये व देशामध्येही सर्वात जास्त सदस्य संख्या असणारा पक्ष आहे. इंदापूर तालुक्यात भाजपची गाव तिथे शाखा काढण्यात येणार असून, आगामी काळात भाजप संपर्क अभियान राबविणार असल्याचेह त्यांनी सांगितले.

अजित पवार यांच्यावर टीका

पाटील पुढे म्हणाले, भाजप पक्षावर नेहमीच मुस्लिम विरोधी पक्ष असल्याची टीका केली जाते मात्र मुस्लिमांविषयी पक्षाचे असलेल्या भावना व ध्येय धोरण त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी बोलताना त्यांनी अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली

ओबीसी आरक्षणबद्दल निषेध

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे. आरक्षण मिळण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दाखवलेल्या नाकर्तेपणाचा यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला. मात्र भाजप निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के आरक्षण देईल, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.