पनवेलमध्ये कोरोनाचा प्रकोप, वाढत्या कोरोना मृत्यूकडे मनपाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

| Updated on: Oct 16, 2020 | 8:07 PM

पनवेलच्या वळवली गावात काही दिवसांच्या अंतराने गावातील एकाच कुटुंबातील 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे (Increase in Corona in death in Valavali village Panvel).

पनवेलमध्ये कोरोनाचा प्रकोप, वाढत्या कोरोना मृत्यूकडे मनपाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी
प्रातिनिधिक छायाचित्रं
Follow us on

पनवेल : पनवेलच्या वळवली गावात काही दिवसांच्या अंतराने गावातील एकाच कुटुंबातील 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे (Increase in Corona in death in Valavali village Panvel). या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यानंतर पनवेल महानगरपालिकेने या परिस्थितीकडे लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक व्यक्त करत आहेत.

सध्या पनवेल तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 472 पर्यंत पोहचली आहे. पनवेल महापालिका हद्दीत कोरोना संसर्गाचा प्रकोप झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यातच आता महापालिका हद्दीतील वळवळी गावातील एकाच कुटुंबातील 4 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. फक्त काही दिवसांच्या अंतराने एका पाठोपाठ होणाऱ्या मृत्यूमुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.

कोरोनाच्या संकटात अवेळी मृत्यू ओढवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय या कुटुंबातील एका महिलेची तब्येत खराब असून त्या आय.सी.यू. मध्ये असल्याची माहिती मिळत आहे. एकंदरीत आता कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ग्रामीण भागातही वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन, तहसील प्रशासन यांच्यासह लोकप्रतिनिधींनीही कोरोनामुळे ग्रामीण भागातील वाढत्या मृत्यूच्या घटनांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असं मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहे.

पनवेलमध्ये सध्या कोरोनाची संख्या वाढत आहे. महापालिकेने आता या गावात विशेष मोहीम राबवून या ठिकाणच्या नागरिकांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक झाली आहे. माझे कुटूंब माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत या तपासणी करावी, अशी मागणी आता महापालिका नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष सतीश पाटील यांनी सांगितले. या ठिकाणी अजूनही पालिकेचा कोणताही अधिकारी गेला नसल्याचाही आरोप केला जात आहे.

वळवलीची घटना ही दुखद आहे. मात्र पनवेल महापालिका पूर्णपणे या गोष्टीकडे गांभीर्याने पाहत आहे. आम्ही गावामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवले आहे. सर्व गावांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली.

हेही वाचा :

पनवेल आरटीओला लॉकडाऊनचा फटका, उत्पन्नात 130 कोटींची घट

महाड दुर्घटनेतील बांधकाम व्यावसायिकाच्या पनवेलमधील आणखी 2 इमारती अतिधोकादायक

वडिलांचा कोरोनाने मृत्यू, बातमी कळताच काही तासातच कोरोनाग्रस्त मुलाला हार्ट अटॅक

Increase in Corona in death in Valavali village Panvel