पनवेल आरटीओला लॉकडाऊनचा फटका, उत्पन्नात 130 कोटींची घट

पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) महसुलात यावर्षी 130 कोटी 19 लाख रुपयांची घट झाली आहे

पनवेल आरटीओला लॉकडाऊनचा फटका, उत्पन्नात 130 कोटींची घट

पनवेल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्वच संस्थांना फटका बसला आहे (Panvel RTO Revenue). पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) महसुलात यावर्षी 130 कोटी 19 लाख रुपयांची घट झाली आहे (Panvel RTO Revenue).

पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नवीन वाहन नोंदणी, वाहतूक परवाना, नुतनीकरण, हवा तो क्रमांक, कच्चा परवाना पक्का परवाना, वाहन हस्तांतरण, फ्लाईंग स्कॉड इत्यादीच्या माध्यमातून महसूल जमा होतो. यात सर्वाधिक महसूल नवीन वाहन नोंदणीच्या माध्यमातून मिळत असतो.

गेल्या वर्षी 200 कोटीचा महसूल प्राप्त झाला होता. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात चांगलीच घट झाली आहे. लॉकडाऊनमुळे यावर्षी फक्त 70 कोटी 47 लाख इतका महसुल प्राप्त झाला असून 130 कोटींची आरटीओच्या उत्पन्नात घट झाली आहे.

कायम स्वरुपात दिले जाणारे अनुज्ञाप्ती डिसेंबरपर्यंत सोळा हजार अर्ज प्रलंबित होते. मात्र, आरटीओच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी एका दिवसात ज्यादा काम करुन अनुज्ञाप्ती परिक्षा घेतल्याने दोन महिन्यांचा विलंबाचा काळ ऑक्टोबर महिन्यापर्यंत आणून दिवसाला 198 चालकांना कायम स्वरुपी अनुज्ञाप्ती देण्याची सुविधा आरटीओने सूरु केली आहे.

Panvel RTO Revenue

संबंधित बातम्या : 

फ्लॉवर 120, कोथिंबीर 100 तर टोमॅटो 80 रुपये किलो, नागपुरात भाजीपाल्याचे दर गगनाला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *