भारत-चीनदरम्यान झडप, भारताचे तीन जवान शहीद, 1975 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर गोळीबार

| Updated on: Jun 16, 2020 | 2:57 PM

भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये चकमक झाली. चिनी सैन्याच्या गोळीबारात भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. India china firing at Galwan Valley

भारत-चीनदरम्यान झडप, भारताचे तीन जवान शहीद, 1975 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर गोळीबार
Follow us on

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये चकमक झाली. चिनी सैन्याच्या गोळीबारात भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील लडाखमधील गलवान खोऱ्यात ही चकमक झाली. लडाखमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच भारत आणि चीनमधील सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. मात्र आता पुन्हा दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबार झाल्याने सीमेवरील चिंता वाढली आहे. (India china firing at Galwan Valley)

1993 च्या सीमेवरील शांतता कराराचा चीनकडून भंग करण्यात आला आहे. भारत-चीन सीमेवर 1975 नंतर प्रथमच असा गोळीबार होऊन सैनिकांचा मारल्याची घटना घडली आहे. 1975 नंतर संघर्षात प्रथमच जवानांचा मृत्यू झाला. 1975 ला भारताचे 4 जवान शहीद झाले होते. 1975 ला अरुणाचल प्रदेशात संघर्ष उफाळला होता.

भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गलवान खोऱ्यात सैन्य माघारीदरम्यान अचानक संघर्ष उफाळला आणि रात्रीच्या वेळी चकमक झाली. गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री दोन्ही सैन्यांमध्ये मोठा संघर्ष झाला. यामध्ये चीनने केलेल्या गोळीबारात भारताचे एकूण तीन जवान शहीद झाले. यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश आहे”.

सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये हे प्रकरण शांत करण्यासाठी घटनास्थळावर बैठक होत आहे. गलवान खोरं हे भारत-चीन सीमेवरील लडाख सीमेजवळचा भाग आहे. यावरुनच चीनच्या कुरापती वाढल्या आहेत. संपूर्ण जग कोरोनामुळे चीनच्या विरोधात उभा आहे. अशा परिस्थितीत कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीन अशाप्रकारच्या कुरापती करत आहे, असं संरक्षक तज्ज्ञांचं मत आहे.

चीनच्या या कुरापती पाहता त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे. भारताने चीनला जशास तसं उत्तर द्यायला हवं, असंही संरक्षक तज्ज्ञ म्हणाले.

चीनचे 5 जवान ठार झाल्याचा दावा

दरम्यान, आपल्याही पाच जवानांचा मृत्यू झाल्याचा दावा चीनच्या ग्लोबल टाईम्सच्या रिपोर्टरने केला आहे. इतकंच नाही तर भारताच्या हल्ल्यात चीनचे 11 जवान जखमी झाल्याचं म्हटलं आहे.

दिल्लीत संरक्षण मंत्र्यांची बैठक

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक होत आहे. चीनकडून झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर ही बैठकहोत आहे. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, CDS प्रमुख बिपीन रावत, आर्मी चीफ मनोज नरवणे उपस्थित आहेत.

दोन्ही देशात शांततेवर सहमती

दोन्ही देश चर्चेद्वारे तणाव कमी करण्यावर सहमत, चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची ग्लोबल टाईम्सला प्रतिक्रिया, सीमेवर शांतता ठेवण्यावर सहमती, चीन सैन्याने सीमा रेषेचं उल्लंघन करु नये असे भारतास सांगितले, कुठलीही एकतर्फी कारवाई तणाव वाढवेल, असं चिनी परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं.

(India china firing at Galwan Valley)