गिलगिट बाल्टिस्तानला राज्य घोषित करुन 70 वर्षांचा अत्याचार लपवता येणार नाही, भारताचं इम्रान खान यांना उत्तर

| Updated on: Nov 02, 2020 | 12:11 AM

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गिलगिट बाल्टिस्तानला राज्याचा दर्जा दिल्याची घोषणा केली. पाकिस्तानच्या या घोषणेवर भारताने आक्षेप घेत विरोध दर्शवला आहे.

गिलगिट बाल्टिस्तानला राज्य घोषित करुन 70 वर्षांचा अत्याचार लपवता येणार नाही, भारताचं इम्रान खान यांना उत्तर
Follow us on

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गिलगिट बाल्टिस्तानला राज्याचा दर्जा दिल्याची घोषणा केली. पाकिस्तानच्या या घोषणेवर भारताने आक्षेप घेत विरोध दर्शवला आहे. गिलगिट बाल्टिस्तान हा भारताचा भाग आहे आणि पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या या घोषणेला भारताचा विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतली आहे (India respond to Imran Khan over Atrocities in Gilgit baltistan).

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले, “पाकिस्तानकडून जबरदस्तीने ताब्यात घेतलेल्या भारताच्या भूभागात कोणत्याही प्रकारचा बदल करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना भारताचा विरोध आहे. केंद्र शासित प्रदेश जम्मू काश्मीर आणि लडाखसह “गिलगिट-बाल्टिस्तान” 1947 च्या करारानुसार भारताचा अविभाज्य भाग आहे.”

“पाकिस्तानला घुसखोरी करत बेकायदेशीरपणे ताबा मिळवलेल्या भागात कोणताही बदल करण्याचा कोणताही अधिकार नाही. पाकिस्तानचे हे प्रयत्न पाकिस्तानमधील 7 दशकांच्या मानवाधिकार उल्लंघन आणि बेकायदेशीर ताब्याला लपवू शकणार नाही. तसेच या भागाला भारतापासून वेगळे देखील करु शकत नाही,” असंही अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं.

“पाकिस्तानने भारताच्या भूभागाची स्थिती बदलण्याची मागणी करु नये. उलट आम्ही पाकिस्तानकडे भारताच्या भूभागावर बेकायदेशीर ताबा सोडून तो भाग तात्काळ भारताच्या ताब्यात देण्याची मागणी करतो,” असंही श्रीवास्तव यांनी म्हटलं.

हेही वाचा :

पुढील दिवसांमध्ये कुणाचे पाय थरथर कापतात आणि कुणाला घाम फुटतो हे पाहूच, इम्रान खान यांची दर्पोक्ती

पुलवामा हल्ल्याची पाकिस्तानच्या मंत्र्याची कबुली, आता काँग्रेसची नेत्यांची बोलती बंद का? राजनाथ सिंहांचा सवाल

‘पुलवामात भारताला घरात घुसून मारलं’, चौफेर कोंडीनंतर पाकिस्तानच्या मंत्र्याचा यू-टर्न

India respond to Imran Khan over Atrocities in Gilgit baltistan