पुलवामा हल्ल्याची पाकिस्तानच्या मंत्र्याची कबुली, आता काँग्रेसची नेत्यांची बोलती बंद का? राजनाथ सिंहांचा सवाल

भाजपचे वरिष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याची कबुली पाकिस्तानने दिल्यानंतर काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. ( Rajnath Singh attacks on Congress after silence over Pakistan Minister admits role of Pakistan in Pulwama attack )

पुलवामा हल्ल्याची पाकिस्तानच्या मंत्र्याची कबुली, आता काँग्रेसची नेत्यांची बोलती बंद का?  राजनाथ सिंहांचा सवाल

पाटणा: भाजपचे वरिष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याची कबुली पाकिस्तानने दिल्यानंतर काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये फवाद चौधरी यांनी पुलवामा हल्ला केल्याची कुबली दिल्यानंतर काँग्रेस शांत का आहे, त्यांच्या नेत्यांची बोलती बंद झालीय का?,असा सवाल राजनाथ सिंह केला आहे. ( Rajnath Singh attacks on Congress after silence over Pakistan Minister admits role of Pakistan in Pulwama attack )

बिहार विधानसभेच्या निवडणुकीतील सभेला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले. पाकिस्तान यापूर्वी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात नसल्याचे म्हणत होता. पुलवामा हल्ल्यामध्ये हात असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवांनावर दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी आमचे जवान शहीद झाले. त्यावेळी काँग्रेस आमच्या हेतूवर शंका उपस्थित करत होती, असं राजनाथ सिंह म्हणाले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करुन बांग्लादेशची निर्मिती केली होती. त्यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले होते.मात्र, आज काँग्रेस आमच्या सरकारच्या कामांवर संशय व्यक्त करते. सीमाप्रश्नांवर पक्षीय भूमिका बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली.

गलवानमध्ये चीनसोबत झालेल्या झटापटीत बिहारमधील जवानांनी शहीद होत देशाचे संरक्षण केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवले, राम मंदिराचा प्रश्न सोडवला, नागरिकत्व सुधारणा कायदा हे मोठे निर्णय घेतले, असं राजनाथ सिंहानी स्पष्ट केले.

पुलवामा हल्ल्याच्या कबुलीवरुन पाकिस्तानचा यु-टर्न

भारतातील पुलवामा हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानची कोंडी होताना दिसताच पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhry) यांनी आपल्या वक्तव्यावरुन यू-टर्न घेतला आहे. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं स्पष्टीकरण देत फवाद चौधरी यांच्याकडून आता सारवासारव करण्याचा प्रयत्न होत आहे. याआधी फवाद चौधरी यांनी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये चर्चा करताना पुलवामा हल्ला हा इम्रान खान सरकारची मोठी उपलब्धी असल्याचं म्हटलं होतं

संबंधित बातम्या:

पाकिस्तानकडून पुलवामा हल्ल्याची कबुली, इम्रान खानच्या मंत्र्याने पाकला उघडं पाडलं

‘पुलवामात भारताला घरात घुसून मारलं’, चौफेर कोंडीनंतर पाकिस्तानचे मंत्र्याचा यू-टर्न

( Rajnath Singh attacks on Congress after silence over Pakistan Minister admits role of Pakistan in Pulwama attack )

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *