पुढील दिवसांमध्ये कुणाचे पाय थरथर कापतात आणि कुणाला घाम फुटतो हे पाहूच, इम्रान खान यांची दर्पोक्ती

इम्रान खान यांनी भारताला इशारा देण्याची दर्पोक्ती केली आहे. आगामी काळात कुणाचे पाय थरथर कापतात आणि कुणाला घाम फुटतो हे पाहूच, असं वक्तव्य करत इम्रान खान यांनी भारताला इशारा दिला आहे.

पुढील दिवसांमध्ये कुणाचे पाय थरथर कापतात आणि कुणाला घाम फुटतो हे पाहूच, इम्रान खान यांची दर्पोक्ती
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 9:43 PM

इस्लामाबाद : सध्या पाकिस्तान जगभरातून टीकेचा धनी ठरतो आहे. पंतप्रधान इम्रान खान यांना आपल्याच देशात जनतेच्या असंतोषाला सामोरं जावं लागत आहे (Pakistan PM Imran Khan). अशातच इम्रान खान यांनी भारताला इशारा देण्याची दर्पोक्ती केली आहे. आगामी काळात कुणाचे पाय थरथर कापतात आणि कुणाला घाम फुटतो हे पाहूच, असं वक्तव्य करत इम्रान खान यांनी भारताला इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानमधील विरोधक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषा बोलत असल्याचाही आरोप केला (Pakistan PM Imran Khan grants provisional provincial status to gilgit baltistan).

इम्रान खान म्हणाले, “आगामी काळात कुणाचे पाय थरथर कापतात आणि कुणाला घाम फुटतो हे सर्वजण पाहतील. पाकिस्तानची सर्व जनता हे पाहील. आपण पाकिस्तानचे मीर कासिम, मीर जफर, मीर सादिक यांना पाहतो आहे. हे तेच लोक आहेत जे नरेंद्र मोदींची भाषा बोलत आहेत. पुलवामा हल्ल्याचं प्रकरण मी ज्या पद्धतीने हाताळलं त्यावर जगभरातून माझं अभिनंदन करण्यात आलं आणि हे लोक आपण हे घाबरुन केल्याचं म्हणत आहेत.”

“भारतात मुस्लिमविरोधी सत्ताधारी आले आहेत. काश्मिरच्या जनतेसोबत तर कोणत्याच सत्ताधाऱ्यांनी चांगलं वर्तन केलं नाही. आत्ता त्यांच्यासोबत जे घडतंय ते पाहता एक मजबूत सैन्याची गरज आहे,” असंही इम्रान खान म्हणाले.

‘गिलगिट बाल्टिस्तानला पाकिस्तानच्या राज्याचा दर्जा दिल्याचा दावा’

इम्रान खान यांनी गिलगिट बाल्टिस्तानला पाकिस्तानच्या राज्याचा दर्जा दिल्याचाही दावा केला. तसेच लवकरच तेथे विकास कामं देखील करणार असल्याचं म्हटलं. इम्रान खान म्हणाले, “गिलगिट बाल्टिस्तानचा विकास मागे राहिला आहे. कारण येथे कोणताही महामार्ग नव्हता. बलूचिस्तान देखील मागे पडला. पंजाब आणि सिंध राज्याचे दुर्गम भाग देखील मागे राहिले. आगामी काळात सर्व विकास या मागे राहिलेल्या भागातच केला जाईल.”

‘पाकिस्तानच्या सैन्यामुळे आपण सुरक्षित’

पाकिस्तान सैन्याचं कौतुक करतान इम्रान खान म्हणाले, “आपल्या पाठिशी सैन्य उभं आहे. एक मजबूत सैन्य असणं किती गरजेचं आहे हे मला जनतेला सांगायचं आहे. यमेन, लिबिया, सिरीया, अफगानिस्तानमध्ये युद्ध होतंय किंवा झालंय. तेथील लोक अडचणींचा सामना करत आहेत. मात्र, पाकिस्तानच्या सैन्यामुळे आपण अगदी सुरक्षित आहोत. इतर देशांची जी अवस्था झाली ती आपली झाली नाही.”

हेही वाचा :

पुलवामा हल्ल्याची पाकिस्तानच्या मंत्र्याची कबुली, आता काँग्रेसची नेत्यांची बोलती बंद का? राजनाथ सिंहांचा सवाल

‘पुलवामात भारताला घरात घुसून मारलं’, चौफेर कोंडीनंतर पाकिस्तानच्या मंत्र्याचा यू-टर्न

हल्ल्याच्या भीतीनेच पाकिस्तानकडून विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका, पाकिस्तानी मंत्र्याच्या खुलासा, भारताची दहशत स्पष्ट

Pakistan PM Imran Khan grants provisional provincial status to gilgit baltistan

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.